अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद करणार असलेल्या आंदोलना पूर्वीच नाशिकचे पालकमंत्री मा. छगनरावजी भुजबळ यांनी दखल घेत घेतलेली बैठक दि 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकारात्मक संपन्न

0
296

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद करणार असलेल्या आंदोलना पूर्वीच नाशिकचे पालकमंत्री मा. छगनरावजी भुजबळ यांनी दखल घेत घेतलेली बैठक दि 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकारात्मक संपन्न

Impact24News Team
दि. 22/02/2021 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पालक मंत्र्यांच्या घरासमोर अधिसंख्य पदासाठी नियोजलेली भुजबळसमिति रद्द करत बोगसांवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि आदिवासींची रखडलेली सरकारी नोकर भरती सरकारने सुरु करावी व विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी करत असतानाच त्याची मा.मंत्री महोदय आणि आधिसंख्य समायोजन समितीचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना .छगनरावजी भुजबळ साहेब यांनी याची तात्काळ दखल घेत राज्यस्तरीय शिस्ट मंडळाला चर्चा करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन नाशिक यांच्या मार्फत बैठक बोलवली होती. शिष्टमंडळात आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आदिवासी विचारवंत मां.एकनाथजी भोये, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाअध्यक्ष मा. लकीभाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश महानिरीक्षक मा. निरजदादा चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. योगेशआण्णा गावीत, कनसरा माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.दुर्गादास गायकवाड, उतर महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष मा. प्रमोद पाडवी, छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष मा.निलेश जुंदरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. गोकुळ टोंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश, रखडलेली नोकर भरती तात्काळ राबवण्यासाठी व त्यासाठी झोपेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या घरावर मोर्चा नेणार आहे. त्याची तारीख, स्थळ लवकरच सर्व समाज बांधवांना कळवण्यात येईल, असे कळवण्यात आले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here