युवक काँग्रेसची मदत मजुरांच्या जत्थ्यावर

0
495

युवक काँग्रेसची मदत मजुरांच्या जत्थ्यावर

गोरगरीब मजुरांना अन्नधान्य व इतर सामग्रीची मदत देवून त्यांच्या पोटापाण्याची समस्या केली दूर

सुखसागर झाडे:- गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भोजनदान सुरू आहे. यासोबतच कोरोना संदर्भात २४ तास मदत कार्य सुरू आहे. यातच बाहेर जिल्ह्यातील हातावर पोट असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मारोडा येथील काही मजूर काम करण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. त्यांनाही युवक कॉंग्रेसने पुढाकार घेऊन अन्नधान्याची मदत केली. यामुळे सहा मजुरांच्या कुटुंबाला मोठी मदत झाली.
कोरोनामुळे शासनाने लॉकडाउन सुरु केले. यामुळे हाताला लागलेले काम हिरावले गेले. बाजारपेठ बंद असल्यामुळे अन्नधान्याची त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. ही बाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ युवक काँग्रेस कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तात्काळ मजुरांना गरज असलेल्या तांदूळ, दाळ, तेल इत्यादी सामग्री देऊन मदत केली.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, विनोद धंदरे, हेमंत मोहितकर, तोफिक शेख, संदीप ठाकरे, रवी गराडे, छत्रपाल भोयर, घनश्याम गोहणे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here