हलाखीच्या परिस्थितीत एस.एस.सी. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीच्या शिक्षणाचा प्राचार्यांनी उचलला खर्च

0
349

हलाखीच्या परिस्थितीत एस.एस.सी. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीच्या शिक्षणाचा प्राचार्यांनी उचलला खर्च

शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विदयार्थीनीला मिळाला आधार

आशिष गजभिये
चिमूर।

समाजात वावरत असताना समाजाप्रति आपले काहीतरी देणे लागतो या भावनेने खूप कमी लोक कार्यरत असतात.असाच प्रसंग खडसंगी येथे अनुभवायला मिळाला. एका गरीब कुटुंबातील वडीलांचे छत्र हरपलेल्या गुणवंत विद्यार्थीच्या शिक्षणाचा खर्च ग्रामदर्शन विद्यालयाचे प्राचार्य सदाशीव मेश्राम यांनी उचलला असून त्यांच्या या कार्याने गरिबीमुळे शिक्षणापासून वंचीत राहण्याची परिस्थिती असलेल्या विद्यार्थिनीच्या स्वप्नाना नवी आशा मिळाली आहे.

चिमूर तालुक्यातील खडसंगी या गावात वास्तव्याने असणाऱ्या वैष्णवी सुनील मेंढुलकर ही विद्यार्थीनी आहे. ती स्थानिक ग्रामदर्शन विद्यालयात शिक्षण घेते घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून यातच भर अवेळी वडिलांच्या निधनाने झाली.तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार तिच्या आई वर आला.परिस्थिती हलाखीची असल्याने शालेय शिक्षणात या विद्यार्थीनीला आर्थिक समस्याना सामोरे जावं लागतं होत.
दरम्यानच्या काळात एस.एस.सी. च्या प्रवेशशुल्का साठी मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब माहिती झाल्यावर प्राचार्य मेश्राम यांनी तिचे प्रवेश शुल्क भरून त्या वेळी सुद्धा तिला मदत केली होती व परीक्षेची चांगली तयारी करून उत्तम टक्केवारी मिळवण्याची अपेक्षा त्यांनी केली होती.
नुकताच एस.एस.सी. चा निकाल जाहीर झाला यात या विद्यार्थ्यांनीने शाळेतून सर्वाधिक दूसऱ्या क्रमांकाचे गुण मिळविले.तिच्या या कार्यावर प्रभावित होऊन शाळा व्यवस्थापनाने या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सत्कार केला. या वेळात प्राचार्य मेश्राम यांनी भविष्यात अशीच शाळेचा गौरव कर अश्या शुभेच्छा दिल्या.या वेळात या विद्यार्थीनीच्या आईने वैष्णवि आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण घेणार नसल्याचे सांगितले. या वेळी प्राचार्य मेश्राम यांनी तिच्या आईला शिक्षणाचं महत्व विषद करीत त्यांच्या मुलीची गुणवत्ता पटवून सांगितली पुढील शिक्षण त्या मुलीच्या भविष्याला वळण देणार ठरू शकत अस सांगत. पुढील शिक्षणासाठी लागणार सर्व आर्थिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. या मुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती असणाऱ्या वैष्णविला नवी दिशा मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here