राष्ट्रीय सेवा योजना व नगर परिषद राजुरा च्या संयुक्त विद्यमाने वर्धा नदी परिसर स्वच्छता अभियान
राजुरा । राहुल थोरात : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या व नगर परिषद च्या संयुक्त विद्यमाने वर्धा नदी परिसरात अलीकडेच पार पडलेल्या सण-उत्सवादरम्यान दुर्गा मूर्तींचे विसर्जन, निर्माल्य नदी मध्ये विसर्जित केल्यामुळे नदीचा परिसर खराब झालेला होता व प्रदूषण सुद्धा वाढलेले होते, यावेळी स्वयंसेवकाद्वारा पाण्यात विसर्जित केलेल्या मुर्त्या व निर्माल्य काढून सोबतच नदीच्या परिसरात इतरत्र पडलेला कचरा जमा करून ते नगर परिषद च्या कचरा विघटन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले, यावेळेस पाच ते सहा ट्रॅक्टर कचरा गोळा केल्या गेला, यावेळी रासेयो स्वयंसेवक, नगर परिषद कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांनी श्रमदान केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वारकड, उपप्राचार्य डॉ. खेराणी, श्री नंदवंशी (अभियंता पाणी पुरवठा नगर परिषद राजुरा), प्रा. गुरुदास बलकी, डॉ. साबळे, डॉ. मल्लेश रेड्डी, डॉ. मुद्दमवार, प्रा. शेंडे, प्रा. दिनेश गोहणे, प्रा. प्रवीण पाचभाई व इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नगर परिषद चे कर्मचारी उपस्थित होते.
