गोरगरिबांचा आधार अतुल शिंदे

0
460

गोरगरिबांचा आधार अतुल शिंदे

या महामारी च्या काळामध्ये दानशूरांनी पुढे येण्याची गरज

बीड/प्रतिनिधी : आ. जितेंद्र आव्हाड युवामंच आ बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ (आष्टी पाटोदा शिरूर) व अशोक अण्णा भालेराव यांच्या सहकार्याने शर्मिलाताई अशोक भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त खडकत, सांगवि आष्टी, टाकळसिंग येथे गरीब व गरजू कुटुंबांना किराणा सामानाचे किट ज्यामध्ये साखर, गोडतेल, मसूर डाळ, मिट पाकीट चहा पावडर एक पाकीट एवढे सामान जवळ जवळ 1000 किट वाटण्यात आली. या सामानाचे वाटप करताना जितेंद्र आव्हाड युवा मंच बीड जिल्हा अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य आष्टी अतुल शिंदे, सांगवी चे सुनील खेडकर दादासाहेब सावंत टाकळसिंग चे जगताप अण्णा संजय जोगदंड तसेच किराणा सामान वाटप करण्यासाठी मदत करणारे गाडी बरोबर चे कैलास भालेराव, नितीन कसबे, सनी भालेराव, भैया तांबोळी रोहन भालेराव, आदी युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा जागतिक महामारी च्या काळामध्ये दानशूरांनी पुढे येऊन सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची गरज आहे. परंतु समाजातला सदन घटक अशा काळामध्ये पुढे येऊन लोकांना मदत करताना दिसत नाही. याची सल अशोक भालेराव आणि अतुल शिंदे यांच्या मनामध्ये होती. गेल्यावर्षी सुद्धा आपत्कालीन काळामध्ये आ. जितेंद्र युवा मंच व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ आष्टी पाटोदा शिरूर अशोक अण्णा भालेराव यांच्या माध्यमातून बऱ्याच सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्य किराणा सामान वाटून एक स्तुत्य उपक्रम राबवला होता. याहीवर्षी शर्मिला ताई भालेराव यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खडकत गावात व शेजारील गावांमध्ये गरजू लोकांना किराणा सामान किट वाटप करून गोरगरिबांच्या आशीर्वाद घेण्याचे काम केले आहे. आमचे नेते आदरणीय जितेंद्र जी आव्हाड साहेब तालुक्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या आदेशाने व युवा मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद भाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गरिबांची सेवा करण्याचे काम आम्ही करत असून आम्ही अतिशय गरजू लोकांना या किराणा सामानाचे वाटप करीत आहोत, असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले. अशोक आन्ना भालेराव यांनी जवळजवळ यावर्षी 160000 रुपये खर्चून खडकत सांगवि आष्टी टाकळसिंग परिसरामध्ये एक खूप मोठा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्यावर्षी अशाच कठीण प्रसंगात गोरगरीबांना आधार मिळावा म्हणून दोन वेळेस अन्नधान्य वाटप दोन वेळेस किराणा सामान वाटप जितेंद्र आव्हाड युवामंच आणि बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ या दोन संघटनाच्या माध्यमातून व अशोक आन्ना भालेराव यांच्या सहकार्याने दोन लाख वीस हजार रुपये इतका खर्च गेल्यावर्षी सुद्धा केला होता. या अशा कठीण प्रसंगात सदर व्यक्तीने पुढे येण्याची खूप गरज आहे. परंतु समाजातला सदर घटक गोरगरिबांची मदत करण्यात कुठेतरी कमी पडताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here