सावरकर नगर येथील झोपडपट्ट्यांबाबत यंग चांदा ब्रिगेडची रेल्वे विभागाच्या डिआरएम यांच्याशी नागपूर येथे चर्चा

0
588

सावरकर नगर येथील झोपडपट्ट्यांबाबत यंग चांदा ब्रिगेडची रेल्वे विभागाच्या डिआरएम यांच्याशी नागपूर येथे चर्चा

झोपडपट्ट्या न हटविण्याची केली मागणी

सावरकर नगर आणि जलनगर येथील झोपडपट्ट्या हटवू नये या मागणी करिता आज यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी नागपुर येथील डिआरएम खेरा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सदर झोपडपट्ट्या हटवू नये अशी मागणी त्यांना करण्यात आली आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमूख सलिम शेख, विजय यादव, प्रल्हाद गेडाम, गिरजा वर्मा, जोसना गोवर्धन आदिंची उपस्थिती होती.

सावरकर नगर आणि जलनगर येथे नागरिक मागील 25 वर्षापासुन वास्तव करत आहे. असे असले तरी सदर झोपडपट्टी हटविण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून हालचारी सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये रोष आहे. ही बाब लक्षात घेता सदर झोपडपट्ट्या हटवू नये अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रेल्वे विभागाचे प्रंबधक मुर्ती यांना देण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेत आज नागपूर येथील डिआरएम यांनी यावरच चर्चा करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांना नागपूर येथे आमंत्रीत केले होते. त्यानुसार यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जाऊन डिआरएम खेरा यांची भेट घेत सदर विषयावर चर्चा करत सदर झोपडपट्ट्या हटवु नये अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here