ताडाच्या झाडावर विज पडून अग्नी तांडव

0
509

ताडाच्या झाडावर विज पडून अग्नी तांडव

भिषण आग विझविण्यासाठी गाव लोक सरसावले

चामोर्शी, सुखसागर झाडे : तालुक्यातील वेलतुर तुकूम येथे आज सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा रिमझिम पाऊस सुरू असताना अचानक विज हि गावालगत असलेल्या संतोष गोहने यांच्या शेतातील ताडाच्या झाडावर विज पडल्याने झाडाच्या फांद्याना भिषण आग लागल्याने अग्नी तांडव निर्माण झाला त्यातच सोसाट्याचा वारा असल्याने आगीच्या ठिगंऱ्या हवेत सर्वत्र थैमान घालत होत्या यात जवळच लागून असलेले सत्यविजय जगझाके यांचे घर आणि अंगणात असलेला गुरांचा चारा (तणसाचे ढिग) असल्याने जनु मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती. परंतु गावकरयांनी मिळून लागलेल्या आगीवर मात करून कोणत्याही प्रकारची जिवितहानी व वित्तहानी झाली नाही. गावकरयांच्या मदतीने या भिषण आगीवर कंट्रोल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here