मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपूर च्या वतीने जिवती येथे शिक्षकांचे चार दिवसीय जीवन कौशल्य प्रशिक्षण संपन्न

0
494

मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपूर च्या वतीने जिवती येथे शिक्षकांचे चार दिवसीय जीवन कौशल्य प्रशिक्षण संपन्न

 

जिवती/प्रतिनिधी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून युवक युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी मागील 21 वर्षापासून भारतामध्ये कार्यरत आहे . एकूण 8 देशामध्ये आणि भारतामध्ये एकूण 22 राज्यामध्ये कार्य करीत असून आता पर्यंत एकूण पाच लाख पेक्षा जास्त मुले मुली या उपक्रमाचा लाभ घेत आहेत . मॅजिक बस इंडिया फाउंडेशन समाजातील वंचित कुटुंबातील मुला मुलींना आणि युवक युवतींना शिक्षण ते रोजगार या प्रवासामध्ये सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यांच्या वयानुसार खेळ घेऊन त्यांच्यातील कौशल्य विकसीत करून त्यांचा विकास घडविण्यासाठी प्रयत्न करते जेणेकरून ते शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होतील आणि स्वत:ची आवड क्षमता ओळखून स्वत:च्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने पावले टाकतील, स्वत: च्या आयुष्यासंबधी विचारपूर्वक चर्चा करत , उपलब्ध असलेल्या पर्यायामधील योग्य पर्याय निवडण्यात सक्षम होतात . त्याचबरोबर स्वताच्या कार्यक्षेत्रात काम करायला अधिक चांगल्या रीतीने तयार होतात आणि स्वताच्या उदरनिर्वाहाच्या हक्कासाठी उपयुक्त संधीचा लाभ घेण्यासाठी सक्षम होतात . जिल्हा परिषद चंद्रपूर आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हयामधील जिवती तालुक्यातील एकूण 38 शाळांमध्ये किशोरवयीन मुला मुलीकरिता सर्वांगीण विकास प्रकल्पाची मार्च 2021 पासून सुरुवात करण्यात आली असून इयत्ता 6 वी ते 10वी मधील एकूण 2200 विद्यार्थ्यापर्यंत संस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून पोहचणार आहे, प्रकल्प हा तीन वर्षांसाठी जिवती तालुक्‍यात राबविण्यात येणार असून या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर खेळाच्या माध्यमातून जीवनकौशल्य आणि कार्य कौशल्य शिकविण्यात येणार आहे . शाळेच्या वेळेमध्ये दर महिन्याला एकदा विद्यार्थ्याबरोबर जीवन कौशल्य आधारित वेगवेगळे सत्र घेण्यात येतील आणि सत्राच्या शेवटी त्यामधून त्यांना एक संदेश देण्यात येईल जो ते आपल्या जीवनामध्ये रुजवतील.

समुदाय जोडणी कार्यक्रमाचा अंतर्गत पालक , शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती सभासद आणि इतर सामाजिक भागधारक यांना या कार्यक्रमात सहभाग वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील . कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी त्याच कार्यक्षेत्रातील काही स्वयंसेवक समुदाय समन्वयक म्हणून संस्था ने आपल्या गावामध्ये निवड केली आहे जे प्रकल्पाचे ध्येय आजि उद्देश समुदायातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहिवण्यासाठी सहभागी होतील.

प्रकल्पाचे उद्देश खालीलप्रमाणे
1. मुलांमध्ये स्वताचा प्रभाव वाढविणे आणि शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे.
2. समुदाय जोडणी कार्यक्रम जो मुलांना शिक्षणाच्या संधी आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयोगी असेल.
3. किशोरवयीन मुलीना मुलाप्रमाणे समान संधी उपलब्ध करण्यासाठी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात लिंगभाव समानतेवर जनजागरण करणे.
4. किशोरवयीन मुलामध्ये इयत्तेनुसार शेक्षणिक प्रगतीसाठी शेक्षणिक वातावरण निर्माण करणे.
5. मुलामुलींना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार करणे.
6. मुलांमध्ये शाळेतून बाहेर पडल्यानंतर काम करण्यासाठी मुलभूत रोजगार क्षमता कौशल्य रुजविणे.

जिवन कौशल्य, स्व व्यवस्थापन, संवाद, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे, सांघिक कार्य
वरील कौशल्ये विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here