प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश

0
446

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश

अखेर संबंधीत प्रशासनाने सर्वच रास्त मागण्या मान्य केल्या

रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता!

 

हिंगणघाट (वर्धा), तालुका प्रतिनिधी अनंता वायसे

 

हिंगणघाट- गाव करी ते राव न करी या म्हणीनुसार गोरगरीबांच्या हितासाठी सदैव जागरूक राहणाऱ्या गजू कुबडे या जनसामान्यांच्या पोराने आज पुन्हा एकदा निगरगट्ट प्रशासनाला झुकविले.

 

येथील उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थे बाबत वारंवार अर्ज विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अनेक गरजू गरीब रुग्णांची आरोग्याबाबत हेळसांड होऊन त्यांना महागडे उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्यात किंवा सावंगी,सेवाग्राम वा नागपूरला जावे लागते हेच ध्यानात ठेऊन रुग्णमित्र गजू कुबडे यांनी या उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या त्रुटी बाबत जिल्हा प्रशासनाने अनेकवार निवेदन देऊन लक्ष वेधले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली ना आमदार-खासदारांनी घेतली. अखेर शेवटी ९ आगस्टच्या क्रांती दिनाचा मुहूर्त साधत गजू कुबडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले.आणि या उपोषणाला पूर्ण ४८ तास होण्याच्या आधीच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. १० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गजू कुबडे यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा केली.यावेळी वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर उपस्थित होते. या चर्चेनंतर तहसिलदार मुंदडा यांनी आरोग्य उपसंचालक नागपूर,व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांच्यासोबत मोबाईल वरून या मागण्यांबाबत चर्चा केली. त्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे याना उपोषण मंडपात लेखी पत्र दिले.

 

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटचे वैद्धकीय अधीक्षक डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे यांच्या न्याय मागण्यां बाबत सुरू करण्यात आलेल्या कार्याविषयी दिलेल्या लेखी पत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोष्टमार्टेम साठी उपलब्ध असलेल्या व्यक्तीला तांत्रिक प्रशिक्षणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक येथे पाठविण्यात आले असून तो वापस येत पर्यन्त खासगी व्यक्तीस जबाबदारी देण्यात आली असून त्याला शासनाकडून मानधन देण्यात येणार आहे,पूर्णकालीन प्रसूती तज्ञा ची व्यवस्था करण्यात आलेली असून गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी सेवा खासगी सोनोलॉजिस्ट कडून मोफत करण्याबाबत उपजिल्हा रुग्णालयासोबत करार झालेला आहे.या रुग्णालयातील दोन डॉकटर हे परसेवेवर असून त्यांना पुर्ववत या ठिकाणी रुजू करण्या बाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे फिजिशियन ची जागा ही संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने तातडीने उपलब्ध होऊ शकणार नाही त्या बाबत शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या लेखी निवेदना नंतर गजू कुबडे यांनी तहसीलदार श्रीराम मुंदडा यांचे हस्ते व चेतन काळे यांना डॉ चाचरकर यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

 

यावेळी प्रहारचे सर्वश्री विनोदभाऊ खंडाळकर वर्धा जिल्हा रुग्ण सेवक,जगदीश तेलहांडे ,अजय खेडेकर उपसरपंच जाम व प्रहार युवा तालुका प्रमुख समुद्रपूर,मोहन पेरकुंडे,सूरज कुबडे,समीर मानकर,सतिषभाऊ गलांडे,राजेश लखाणी, दिवाकर वाघमारे,रोशन थूटे,केशव लेंडांगे, पिंटू हिवंज,अजय लढी, विनोद धोबे, संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे, नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,रुपराज भगत,दिवाकर घंगारे, राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे, तबरेज पठाण, सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे, राहुल चौधरी, रितेश गुदढे प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here