एकलव्य शाळेत कोरोना योद्धाचा सत्कार

0
333

एकलव्य शाळेत कोरोना योद्धाचा सत्कार

धीरज मेश्राम व राम माणिक यांचा सत्कार

अमोल राऊत

काविड 19 या प्रादुर्भावाने जगात थैमान घातले आहे. दिवसागणित कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. रुग्णाची सेवेसाठी डॉक्टर , पोलिस प्रशासन शिक्षक तसेच विविध सामाजिक संस्था अहोरात्र काम करताना दिसुन येत आहे. अश्या समजासेवा भाव ठेवणारे शिक्षक वृंदाचे सत्कार एकलव्य मॉडेल निवासी शाळा देवाडा येथे करण्यात आले.
शिक्षक दिना निमित्त एकलव्य मॉडेल निवासी शाळा देवाडा येथे कोरोना काळात सेवा देणारे धीरज मेश्राम आणि राम माणिक या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
आपले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपण आपले जीव धोक्यात घालून कोरोना सोबत लढाई लढत आहे. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे अशी प्रतिक्रिया प्राचार्या रूपा बोरकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा थुंबे, प्रेमलता बिसेन, सय्यद जाकिर, प्रांजली उंदिरवाडे, प्रदीप पेंदोर, शिल्पा डोये , संजय उपलेटीवार, राकेश सिकलवार,अशोक जेरपोतलावार, बबन मेश्राम, सुवर्णा चेनुरवार, सुरेखा तोरे, विजय मेश्राम, या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अराक यांनी केले तर आभार प्रदर्शन सुबोध गेडाम यांनी केले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here