राजुरा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न ; तालुक्यातील युवकांचा प्रवेश

0
413

राजुरा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न ; तालुक्यातील युवकांचा प्रवेश

अमोल राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेऊन मागील काही महिन्यांपासून राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक युवक तथा इतर पक्षांतील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्य करण्यासाठी इच्छुक असून एका पाठोपाठ एक मंडळी तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. 06 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजुरा तालुकाध्यक्ष श्री. आसीफ सय्यद यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेऊन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. नितीन भटारकर, राजुरा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. अरुण निमजे, तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर, युवकचे विधानसभा अध्यक्ष श्री. कुणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुक्यातील 30 युवकांनी राजुरा येथे राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, शहर चे नेते रखीब शेख, राजू ददगाड, तथा युवक चे महासचिव सतीश तेलजिरवार, स्वप्नील रासेकर, श्रीनिवास मिसलवार, संतोष धोटे, सुजित कावळे, रमिझ बेग, प्रमोद रामटेके, विवेक मोंढे, तेजस अवगान, किशोर रासेकर, अनिकेत गिरसावले, स्वप्नील बोरकुटे, गुरुदास मडावी, अतुल करमरकर, धीरज खिरेकर, नंदू रामटेके, जयंत जूनघरे, मोरेश कोरडे, गणेश निवलकर, अभी सूर्यवंशी, समीर सय्यद, राहुल सूर्यवंशी, साहिल शेख, राहुल पांडव, अजय धूमणे, श्रेयस कसवटे, महेश लोहे तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष श्री आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वात तथा रोहित दादा पवार विचारमंच जिल्हाध्यक्ष श्री. अभी कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुजित कावळे यांची रोहित दादा पवार विचारमंच राजुरा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना येणाऱ्या काळात अनेक युवक तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर तथा युवकचे तालुकाध्यक्ष श्री आसीफ सय्यद यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here