आरक्षण नाही म्हणून 9 हजार रुपयात ताडोब्यात पर्यटकांना प्रवेश!

0
446

आरक्षण नाही म्हणून 9 हजार रुपयात ताडोब्यात पर्यटकांना प्रवेश!

वनरक्षकासह एकाला पोलिसांनी केली अटक

वनविभागात खळबळ

तालुका प्रतिनिधी
चिमूर

ताडोबा अभयारण्यात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांकडून पैसे घेत प्रवेश देण्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.
ताडोबा हे जगप्रसिद्ध उद्यान असून, येथे हमखास वाघ, बिबट, व अन्य वन्यप्राणी पहावयास मिळत असल्याने, येथे दिवसेंदिवस जगभरातील पर्यटकाची गर्दी होत आहे. ताडोबात पर्यटकांना मनसोक्त आनंद मिळतो आहे. त्यामुळं पर्यटकांना ताडोबाचे भुरळ पडले आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना ताडोबात येण्याचं मनस्थिती होत असते, पण ताडोबात आरक्षण मिळत नसल्याने, आरक्षण मिळण्याकरिता ताडोबा कोअर झोन मधील दोन वनरक्षकांनी नऊ हजार रुपये घेऊन पर्यटकांना ताडोबात प्रवेश दिल्याची माहिती मिळाली असल्याने नवेगाव कोअर प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद सोनूले यांनी एका खाजगी सचिन कोयचाडे व्यक्तीला सोबत घेत हा प्रकार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला.
सदर आरोपी 1 डिसेंम्बरला नवेगाव प्रवेश द्वारावर पर्यटकांकडून पैसे घेत गेटच्या आत प्रवेश देत असल्याची माहिती क्षेत्र संचालक यांना मिळाली तात्काळ त्यांनी नवेगाव प्रवेशद्वार गाठून दोघांना सक्तीने विचारपूस केली असता, पर्यटकांकडून 9 हजार रुपये घेत असल्याची त्यांनी कबुली दिली.
असा प्रकार अनेकदा केला असल्याचे सुद्धा क्षेत्रसंचालक यांच्या समक्ष वनरक्षक सोनूले व कोयचाडे यांनी सांगितले. दोघांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार देत ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पचे आरक्षण मिळविण्यासाठी वनविभागाने कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही, पर्यटकांनी अश्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, आरक्षणासाठी www.mytadoba.org या संकेतस्थळाचा वापर पर्यटकांनी करावा असे आवाहन ताडोबा व्याघ्रप्रकल्पतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here