वाघाच्या हल्यात गुराखी ठार, सिंदेवाही वनपरिक्षेञातील घटना

0
370

वाघाच्या हल्यात गुराखी ठार, सिंदेवाही वनपरिक्षेञातील घटना

सिन्देवाही तालुक्यात पुन्हा एखदा वाघाचा हमला

तालुक्यातील चिकमारा जंगल परिसरातिल घटना, गावकरी दहशतित

 

सिंदेवाही : तालुक्यातील वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या तांबेगडी मेंढा उपवनपरिक्षेत्रा मध्ये चिकमारा जंगल परिसरात गुरे चराई करिता गेलेल्या गुराख्याला वाघाच्या हल्ल्यात आपला जिव गमवावा लागला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तांबेगडी मेंढा उपवनपरिक्षेत्र येथील चिकमारा जंगल परिसरात शनिवारला रामदास डुकरू नैताम नामक गायकी गुरे चराई करिता चीकमारा जंगल परिसरात गेला होता. तो संध्याकाळी परत न आल्याने गावातील लोकांनी उपवनपरिक्षेत्र सहाय्यक बुरांडे यास माहिती दिली असता वनविभाग तांबेगडी मेंढा येथिल चमू व चीकमारा येथील गावकरी यांनी जंगल परिसरात शोधा शोध घेतली असता रविवार सकाळी सात वाजता गुराख्याचे प्रेत चीकमारा जंगल परिसरात आढळले.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला गुराखी रामदास डुकरु नैताम (वय 63 वर्ष, रा. चिकमारा) याचे शव पंचनामा करून शवविच्छेदन करिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. मागिल काही वर्षापासून चंन्द्रपूर जिल्ह्यातिल सिन्देवाही तालुक्यात वारंवार वाघाचे हमले होत असून त्यात शेकडो पाळीव जनावरे, नागरीकांनी आपला जिव गमविला तर अनेकजन जखमी झाले आहे. परिसरातील जनतेत चांगलीच दहशत निर्माण झाली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here