शेतकरी व कामगारांच्या मागण्यासाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांचे सेवाग्राम आश्रम समोर धरणे आंदोलन.

0
359

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनीधी

 

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या परवा वर करण्यात आले धरणे आंदोलन.

वर्धा/हिंगणघाट:- 2 ऑक्टोंबर 2020
शेतकरीच्या व कामगारांच्या न्याय मागण्यासाठी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या परवा वर सेवाग्राम आश्रम समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात कृषिप्रधान देशातील..आम्ही शेतकरी या नावाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी धरणे आंदोलनाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी भेट दिली व त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्यांनी निवेदन स्वीकारले त्यावेळी सोबत आमदार रंजीत कांबळे उपस्थित होते. मागण्या खालील प्रमाणे 2 लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना सरकार तर्फे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत लाभ देण्यात यावा, बँकेतील नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात यावे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व बँकेच्या चुकीमुळे ज्या कर्जदारांना 2 लाखाचा लाभ मिळाला नाही त्यांना चुक दुरुस्त करून लाभ द्यावा, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी मंजूर केलेले तिन्ही विधेयक रद्द करण्यात यावे, केंद्र सरकारने संसदेमध्ये कामगार विरोधी धोरण मंजूर केले असून ते मागे घेण्यात यावे, वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सोयाबीन-कापूस-मोसंबी-संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त झाले असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने सर्वे करून पीकनिहाय आर्थिक मदत देण्यात यावी, 14 वर्षापासून प्रलंबित गोजी लघु पाटबंधारे प्रकल्प शेतकरी हितासाठी रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांची जमीन परत करण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी कृषिप्रधान देशातील आम्ही शेतकरी या नावाखाली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त धरणे आंदोलन करण्यात आले व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे ,यांना निवेदन पाठवण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किसान सभेचे संजय काकडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोड़मारे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, विनोद पांडे ,रेवाशंकर वाघ,विठ्ठल चौधरी, संदीप भांडवलकर टी.सी राऊत, संदीप राऊत, कवडु बुरंगे,निळकंठ राऊत,सुनील निमसड़कर,शारदा केने,सुनील भोंगे,श्रीकांत बाराहाते,सौ.अर्चना मोरे, राजू मडावी, संजय तपासे (माजी सभापती), अनंतराव झाडे (सचिव विधानसभा आर्वी), सुरेश पोटदुखे, संजय शिरसागर,ओमकारेश्वर मुंडे, महेंद्र पाटील मसाळा, सुरेश सिंग मेहेर ,सौ.अनिता दाते,शेखर वरघने,बाजीराव हिवरे, दिलीप महाजन, सुनील हेटे, गिरधर निंभोरकर ,अमोल दौड, गजानन हायगुने,वसंत नारनवरे ,पिंटू पांगुळ, प्रमोद पिंपळे,महेंद्र पवार, हरीश काळे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here