कोरोना काळात कार्यकर्त्यांनी सेवा करावी आमदार बंटीभाऊ भांगडीया

0
303

कोरोना काळात कार्यकर्त्यांनी सेवा करावी
आमदार बंटीभाऊ भांगडीया

सेवा सप्ताह निमित्त मासळ येथील बैठक

चिमूर

मागील दहा महिन्यापासून महाविकास आघाडी शासन राज्यात सत्तेवर आहे.तेव्हा राज्य शासनाने कोरोना महामारीत जनतेला मोफत धान्य दिले नसून  सिलेंडर चा मोफत पुरवठा केला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नी धान्य मोफत दिले आहे. मुख्यमंत्री घरून बाहेर निघत नाही. ब्रम्हपुरीत भयानक पूर आले असताना केवळ पाच हजार देण्याची घोषणा केली असली तरी अनेकांच्या खात्यात जमा झाली नाही. कृषी विधेयक वर कांग्रेस आंदोलन करीत आहे .कारण शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करायचा नाही .परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांना बळकट करणार आहे. एक भारत एक संविधान करण्याचे वचन पंतप्रधान मोदी नी केले आहे .शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक आणले आहे .नोट बंदी मुळे काळा पैसा बंद झालेला आहे. कृषी बिल मुळे काळाबाजर बंद होणार आहे . तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आहे लस निर्मिती होई पर्यत कार्यकर्त्यांनी काळजी घेत जनतेची सेवा करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.

मासळ मदनापूर जीप क्षेत्रातील कार्यकर्ता पदाधिकारी च्या कोरोना काळात भाजप सेवा सप्ताह च्या बैठकीत आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी डॉ श्यामजी हटवादे राजू पाटील झाडे प्रकाश वाकडे प्रवीण गणोरकर डॉ देवनाथ गंधारे ओमप्रकाश गणोरकर गजानन गुळध्ये समीर राचलवार असिफ शेख अशोक कामडी सुरज नरुले आदी उपस्थित होते.

डॉ श्यामजी हटवादे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायदा वर विस्तृत मार्गदर्शन करीत कांग्रेस पक्ष चुकीचा संदेश देत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी नी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे केले येणारे कायदे ची विस्तृत माहिती कार्यकर्त्या पर्यत बुकलेट च्या माध्यमातून येणार असल्याचे सांगितले. पक्षातील कार्यकर्ता कोरोना ग्रस्त आढळल्यास सहानुभूती म्हणून संपर्कात राहून मदत करण्याचे सांगितले.
माजी सभापती राजू पाटील झाडे म्हणाले की कृषी विधेयक वर विरोधी पक्ष आक्रमक होऊन आंदोलन करीत असले तरी कृषी कायदा मुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगितले मालाची किंमत जरी कोसळली तरी मिनिमम भाव देऊन सरकार खरेदी करणार आहे बाजार समिती ह्या बरखास्त केल्या नसून त्याच स्थितीत ठेवण्यात आली असून
बाजार समितीने शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगितले

संचालन गजानन गुळध्ये यांनी केले. जीप क्षेत्रातील बूथ अध्यक्ष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here