पत्रकार अजीत माळींने केले वाढदिवशी रक्तदान

0
619

पत्रकार अजीत माळींने केले वाढदिवशी रक्तदान
उस्मानाबाद- किरण घाटे -उस्मनाबाद शासकीय रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीच्या शुद्ध पाणी सेवेच्या उपक्रमात पत्रकार अजीत माळी यांनी सामाजिक भान जोपासत सध्याच्या कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटातील परिस्थितीत स्वताच्या वाढदिवसा निमित्त आज रक्तदान केले व शुद्ध पाण्याचे दान करुन रुग्ण सेवेत सहभागी झाले. भूतपूर्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे यांनी अजीत माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव,पाणी दान याविषयी मनोगत व्यक्त केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी देखिल अजीत माळी यांना वाढदिवसाच्या शुभकामना दिल्या,सदरहु पाणी दान कार्यक्रमात तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक राजभाऊ गलांडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ .सचीन देशमुख,डॉ.गोसावी, डॉ.गणेश पाटील, परिचारिका संध्या निकम,शेख ब्रदर,सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडी,उमेश राजे निंबाळकर,रुग्ण कल्याण समिती सदस्य अ लतिफ अ .मजीद,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,सचीन चौधरी, मृत्युंजय बनसोडे, रमेश गंगावणे अन्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here