वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य : मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
372

वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य : मंत्री सुधीर मुनगंटीवार

यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा

आयएमए च्या वुमेन्स विंग तर्फे वृक्षारोपण संपन्न

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

 

 

कोणतेही सामाजिक कार्य व आंदोलन जनतेच्या सहभागा शिवाय यशस्वी होवू शकत नाही , सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य जनतेचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. वृक्षारोपणासाठी आयएमए च्या वुमेन्स विंगने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे.मी वनमंत्री असताना राज्यात विक्रमी वृक्षारोपण करण्यात आले. ही मोहीम लोक सहभागामुळेच यशस्वी होवू शकली, असे प्रतिपादन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. १४ ऑगस्ट रोजी आयएमए च्या वुमेन्स विंगच्या माध्यमातून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, प्राणवायु साठी वड , पिम्पळ , औदुम्बर, बेल , आंबा , कडुनींब आदी वृक्ष लावणे आवश्यक आहे.अनेक झाडांना पौराणिक महत्व आहे. आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड़ होत आहे व त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत आहे. अशावेळी पर्यावरणाचे रक्षण करण्याची जवाबदारी आपली आहे.असेही ते म्हणाले.

चाहते हो यदी जीवन बचाना , मत भूलो फिर वृक्ष लगाना ही कवितेची ओळ उधृत करत श्री मुनगंटीवार म्हणाले, या जिल्ह्यात मी अनेक वन उद्यान , बगीचे निर्माण केले मात्र जॉगर्स पार्क मध्ये आल्याचा आनंद आज होतोय. वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य आहे , हे कार्य अविरत सुरु ठेवावे असे सांगत आयएमए पदाधिका-यांनी वनविभागाच्या प्रमुखांसह मीटिंग घेवून यात आणखी काय सुधारणा करता येईल ते सांगावे , मी निश्चितपणे योग्य प्रयत्न करेन असेही श्री मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश मोहीते, आय.एम.चे. अध्‍यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव नगिना नायडू, महिला अध्‍यक्षा डॉ. सौ. कल्‍याणी दिक्षित, मुख्य वनसंरक्षक श्री लोणकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्‍यक्ष विठ्ठलराव डुकरे, रवी लोनकर, महानगर सचिव उमेश आष्‍टनकर, आय.एम.ए. चे सर्व पदाधिकारी व डॉक्‍टर्स, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी , नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here