महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या कु.सायली टाेपकरची ६व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धे साठी निवड !

0
1067

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या कु.सायली टाेपकरची ६व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धे साठी निवड !

येत्या ६ मार्चला “ती” हाेणार नेपाळला रवाना !

अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे ,व प्रभा अगडेनी दिल्या सायलीला शुभकामना ! 🟥🟣🟩सांगली🟢🛑🟧💠🟣किरण घाटे 💠🟡इम्पँक्ट -24 जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟪🟨🟣💠नेपाळ शिताेरियाे कराटे डाे असाेसिएशन च्या वतीने येत्या १२मार्च व १३मार्च राेजी नेपाळ (काठमांडू)येथे ६व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले आहे .🟣💠🟡🛑🟢🟢🟨🟪🟧आयोजित या कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंची सदस्या तथा काेल्हापूर काँलेज आँफ इंजिनिअरची विद्यार्थींनी कु .सायली टाेपकरची निवड करण्यांत आली असुन तश्या आशयाचे पत्र तिला नुकतेच प्राप्त झाले असल्याचे कु.सायलीने खुद्द या प्रतिनिधीस आज दुपारी भ्रमनध्वनी वरुन सांगितले .🟩🟥💠🟢🟣🟧🟡🛑🟩कु .सायली टाेपकर सांगली जिल्ह्यातील दुधारी या गावची मुळ रहिवाशी असुन तिचे सामाजिक , शैक्षणिक व क्रीड़ा क्षेत्रात आज पावेताे माेलाचे योगदान राहिले आहे .महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना व संस्थेनी तिच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असुन गाेड काैतुक केले आहे .🟪🟨🟢🟩🛑💠🟧🟧🟥दरम्यान सायली येत्या ६मार्चला नेपाळ दाै-यासाठी रवाना हाेत आहे .या स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल सायलीचे सहजं सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे , कविता चाफले , ज्याेति मेहरकुरे , पुनम रामटेके , श्रध्दा हिवरे , प्रतीक्षा झाडे ,रजनी रणदिवे सुविधा बांबाेडे आदिंनी अभिनंदन करुन तिला शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here