चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांचे वाढदिवसाला रक्तदान शिबीराचे आयोजन तथा दिनदर्शीकेचे विमोचन

0
575

चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांचे वाढदिवसाला
रक्तदान शिबीराचे आयोजन तथा दिनदर्शीकेचे विमोचन

चंद्रपूर 🟢🛑किरण घाटे🟡🟣

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवस आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर, गुरुद्वारा, बुद्ध विहार, जमनजट्टी दर्गाह, आंद्रिय चर्च इत्यादि धार्मीक स्थळी भेट देत प्रार्थना करत दिवसाची सुरुवात केली.
🟢💠🟩🟣दरवर्षी प्रमाणे यंदाही आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमीत्य शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन येथील कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवासाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. सदरहु कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवा आघाडीच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले. दुपारी १२ वाजता आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात २०२१ या नव्या वर्षाच्या दिनदर्शीकेच्या विमोचन करण्यात आले होते. हा साेहळा माजी आमदार वामनराव चटप यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते पार पडला. 🟣☀️🌀🟢🟩💠 आ. किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा विरोधी पक्ष नेता डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, माजी नगर सेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल, राजेश नायडू, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर, युवा नेते अमोल शेंडे, राजू जोशी , युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, राशिद हुसेन, विश्वजीत शाहा, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 🟩💠🌼🌀दुपारी १ वाजता यंग चांदा ब्रिगेडचे नरेंद्र मडावी यांच्या वतीने बाबूपेठ येथील जूनोना चौकात हळदी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे साईराम मडावी यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती.विद्यमान आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी ३ वाजता यंग चांदा ब्रिगेडच्या संघटीका चंदा ईटनकर यांच्या वतीने तुकूम येथील हनुमान मंदिर येथे महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.🟪🔶🟨🟢 या कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार यांची प्रमूख उपस्थिती होती. तसेच यावेळी महिलांची उपस्थितीही उल्लेखनिय होती. सायंकाळी ६ वाजता यंग चांदा ब्रिगेडचे संघटक देवा कुंटा यांच्या वतीने लालपेठ येथे कोरोना योध्दांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योवेळी कोरोनाकाळात सेवा देणा-या कोरोना योध्दांचा आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. अश्या एक नाही तर अनेक विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमांतून आज आ. किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाबाबत सर्व नियम या कार्यक्रमांमध्ये पाळण्यात आले हे या कार्यक्रमांचे वैशिष्ठ हाेते🛑🟢🟣🟡🟩
सदरहु सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवक आघाडी, महिला आघाडी, युवती आघाडी, कामगार संघटना, आदिं शाखांच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले

🟣🟡आमदार किशोर जोरगेवार यांनी केले प्लाझ्मा दान!  आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य आज प्लाझ्मा दान केले. शिबिराचे आयोजन करण्यात आले.🌼🟢🌀🟩🟣 यावेळी आ.जोरगेवार यांच्यासह अनेकांनी प्लाझ्मा दान केले. माजी आ. वामनराव चटप यांची यावेळी उपस्थिती होती.
ऑगस्ट महिण्यात आ. किशोर जोरगेवार यांचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला होता.🟡🛑🟣 त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांच्या लढ्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान त्यांच्या वाढदिवसा निमीत्त आज जैन भवन जवळीत जनसंपर्क कार्यालयात प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 🛑🟡🟢🟩💠आ. जोरगेवार यांनी स्वत: प्लाझ्मा दान करत कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी प्लाझ्मा दानसाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी समोर येण्याचे आवाहन या प्रसंगी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here