बल्लारपूर नगरीच्या राकेश कांबळेंचा चंद्रपूरात झाला सत्कार ! 

0
640

बल्लारपूर नगरीच्या राकेश कांबळेंचा चंद्रपूरात झाला सत्कार ! 

कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती!

चंद्रपूर, बल्लारपूर-विदर्भ – किरण घाटे विशेष प्रतिनिधी – जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई , रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वैच्छिक रक्तदान चळवळीस प्रेरक रक्तदाते व रक्तदान शिबीर आयोजक संस्थांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरागांधी सभागृहात काल शुक्रवार दि.१८जूनला आयोजित करण्यात आला होता.

या आयाेजित कार्यक्रमात बल्लारपूर नगरीचा युवा सामाजिक कार्यकर्ता राकेश कांबळे यांचा अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थित गौरव करण्यात आला.कांबळे यांनी दोनदा बल्लारपूर शहरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,डॉ. भास्कर सोनारकर,डाँ .अनंत हजारे ,चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले उपस्थित हाेत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here