नवेगाव माल येथे २५६५ वी बुद्ध जयंती साजरी

0
474

बौद्ध उपासक उपासिकांनी कोरोणा नियमाचे काटेकोर पालन करीत तथागत गौतम बुद्धांच्या चरणी वाहिली मानवंदना

 

चामोर्शी/सुखसागर झाडे

चामोर्शी : तालुक्यातील मौजा नवेगाव माल येथे बौद्ध समाजाच्या वतीने २५६५वी तथागत भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम आयुष्मान केशव ठेमस्कर व कविताताई रामटेके यांच्या हस्ते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आयुष्मान आबाजी दुर्गे यांचे हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वसंत रामटेके यांनी केले.प्रसंगी उपस्थितांना केशव ठेमस्कर व परिवारातर्फे भोजनदान करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी देवानंद दुर्गे, मनोहर रामटेके, सुधाकर रामटेके,माणिक गायकवाड,विलास गायकवाड,अमोल दुर्गे, वैभव ठेमस्कर, मंजुषा रामटेके,ज्योती दुर्गे,त्रिषाली गायकवाड, नंदकिशोर रामटेके व सर्व समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here