तहसील कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य ; शासनच फसले चिखलात

0
316

तहसील कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य ; शासनच फसले चिखलात

जिवती | चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम ग्रामिण भाग, विकासाच्या बाबतीत जिवती तालुका पिछाडीवर, अशी ओळख असलेल्या तालुक्याच्या मुख्य तहसील कार्यालय पटांगण चिखलाने माखलेले असून त्याच चिखलात महाराष्ट्र शाासनाची गाडीच फसल्याने, आता शासनच चिखलात फसल्याची खमंग चर्चा रंगु लागली आहे. व या चिखलाने माखलेल्या कार्यालयाचा वाली कोण ? अशी चर्चा जनतेेेत केली जात आहे.

या माखलेल्या दल-दल चिखलामध्ये महाराष्ट्र शासनाची गाडी फसली, फसलेल्या गाडी ला संबंधित विभागाचेे कर्मचारी काढण्याचे प्रयत्न करीत होते, अशी परिस्थिती तालुक्याच्या मुख्य तहसील कार्यालयाच्या पटांगणात निर्माण झाली आहे. यालाच म्हणतात का स्वच्छ भारत अभियान? कदाचित कोणा व्यक्तीला स्वच्छ परिसर ठेवण्याचे धडे गिरवायचे असल्यास त्या व्यक्तीने तहसील कार्यालय परिसराला भेट द्यावी असा सुर जनतेतून केला जात आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here