बंदर (शिवापूर) येथे पक्षी सप्ताह साजरा

0
496

बंदर (शिवापूर) येथे पक्षी सप्ताह साजरा

चिमूर । आशिष गजभिये

तालुक्यातील बंदर(शिवापूर) येथे राज्य सरकारने जाहीर केलेला पक्षी सप्ताह ज्ञानशाळेचा विद्यार्थ्यांनाद्वारे साजरा करण्यात आला.विविध उपक्रमांम राबवित विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानात भर टाकण्यात आली.
शाळा बंद असल्याने मागील तीन महिन्यापासून गावातील होतकरून तरुणांच्या पुढाकाराने बंदर (शिवापुर) येथील समाजमंदिरात मागील तीन महिन्यांच्या काळापासून ज्ञानशाळेचा उपक्रम सुरू आहे. राज्य सरकाने प्रथमच पक्षी सप्ताह राबविण्यातचे जाहीर केलं होतं. याला प्रतिसाद देत या ज्ञानशाळेचा वतीने विद्यार्थ्यांसाठी वनभोजन आयोजित करीत चित्रकला स्पर्धा व पक्षी माहितीपट आयोजित करण्यात आलं. विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या माहिती सह निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन व वन्यप्राणी संवर्धनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फ़ुले या अभ्यासिका परिवार चे निलेश नन्नावरे,बादल श्रीरामे, सुमेध श्रीरामे, आदित्य वासनिक, जीवन तराळे, सूरज गायकवाड, आशिष जीवतोडे, आकाश तराळे, अनिरुद्ध वासनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here