अवैध रेती वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई

0
532

अवैध रेती वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई

खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाचे धाडसत्र     

चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने नुकतेच धाडसत्र राबविले व मोठ्या प्रमाणात अवैध रेतीसाठा व वाहतुकीचे वाहन जप्त करून दंड वसुलीची कारवाई केली.

दिनांक 12 डिसेंबर 2020  रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने मौजा विसापुर वर्धा नदी पाण्याचे टाकीजवळ भेट दिली असता येथे अवैध रेती वाहतुक होत असल्याचे  आढळुन आले. सदर वाहन चालक रेतीची अवैध वाहतुक करत असल्यामुळे दिलीप खेडकर रा.विसापूर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH34AP 2533, जप्त करुन तहसिल कार्यालय बल्लारपूर यांचेकडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे.

सकाळी 8.00 वाजता नगर परिषद समोर ता. बल्लारपूर, येथे अवैध रेती वाहतुक होत असल्याचे  आढळुन आले. श्री. आरीफ मेहताब खान यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH34 AB 1817 जप्त करुन तहसिल कार्यालय बल्लारपूर यांचे कडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे. सदर वाहनावरील दंडाची  रक्कम रु. 1,10,900/- वसूल करण्यात आलेली आहे.

सकाळी 10.30 मौजा लालपेठ हनुमान मंदीर जवळ, चंद्रपूर येथे अवैध रेती वाहतुक होत असल्याचे  आढळुन आले.  सदर वाहन मिथलेश चन्ने, चंद्रपूर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH34M 4363 व MH34 M 1037 जप्त करुन तलाठी चंद्रपूर यांचे कडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे. सदर वाहनावरील दंडाची  रक्कम रु. 2,32,700/- वसूल करण्यात आलेली आहे.

दुपारी 12.45 वाजता मौजा येंसा ता. वरोरा  येथे अवैध माती वाहतुक होत असल्याचे  आढळुन आल्याने श्री. सुरज केळकर रा.बेलगाव ता वरोरा यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH34AP 1729 जप्त करुन तहसिल कार्यालय श्री. नथ्थुजी चिकाटे कोतवाल , येंसा यांचे कडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे. सदर वाहनावरील दंडाची  रक्कम रु. 1,05,16 0/- वसूल करण्यात आलेली आहे.

दुपारी 2.15 वाजता मौजा पिंपळगाव गाव ता.वरोरा येथे बंद खाणपट्ट्यात  पोकलँड मशीनव्दारे अवैध दगडाचे उत्ख्‍नन करीत असल्याचे  निदर्शनास आल्याने पोकलॅन नं टाटा – 110 जप्त करुन तहसिल कार्यालय के.एल परचाके तलाठी खांबाळा  जि. चंद्रपूर यांचे कडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे. सदर वाहनावरील दंडाची  रक्कम रु.7,50,000/- वसूल करण्यात आलेली आहे.

            शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर जवळ  येथे WCL माना (प्रमुख खनिज) क्षेत्र यांचे वाहन क्रमांक MH34AB 7207  रेती/वाळु (प्रमुख खनिज) (Sand for stowing) वाहतुक होत असल्याचे  आढळुन आले. सदर वाहन चालकाजवळ  वाहतुक पासेसवर वजनाचे प्रमाण न टाकल्यामुळे  सदर वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय चंद्रपूर यांचे कडे सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आलेले आहे.

            संबंधीतांवर नियमाप्रमाणे कारवाई करून दंड आकारण्यात येत असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here