शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा !

0
260

शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा !

आंदोलनकारी शेतक-यांना न्याय द्या- आपची मागणी !

🟡🛑चंद्रपूर किरण घाटे🟡🟤
🌼☀️सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित झाल्यापासून संपूर्ण देशात तिन्ही कायदे रद्द करण्यांच्या उद्देश्याने शेतकरी व विविध शेतकरी संघटनां आंदोलन करीत आहेत.परंतु आतापावेताे सरकार कडून या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही . 🟤🛑🟧💠त्यामुळे देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर अर्थात दिल्ली येथे आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या याेग्य व रास्त असुन त्या
मागण्या शेतकरी हिताच्या अाहे .🟦🟣🟢🔵 शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी चंद्रपूर आम आदमी आदमी पार्टी
या आंदोलनात पूर्णता सहभागी हाेत आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक
घेवून सकारत्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत तदवतचं विविध ठिकाणी आंदोलन करणांऱ्या शेतकऱ्यांवर लावण्यात आलेल्या केसेस
मागे घ्याव्यात अशी मागणी देखिल आपने केली आहे .🟪🟨🟥🟩या अगोदर सुध्दा आम आदमी पार्टी ने सप्टेंबर महिन्यात आंदोलनाद्वारे काळा
कायदा मागे घ्या ही मागणी रेटुन धरली होती. परंतु सरकारने मागणी पूर्ण केली नाही.🟦🟢🟧💠 सध्याच्या स्थितीत संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. उपरोक्त परिस्थिती बघता आंदोलनकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून येत्या 3 दिवसात रास्त मागण्या पूर्ण कराव्या ! अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर चे कार्यकर्ते सुद्धा शेतकर्‍यांच्या या आंदोलना समर्थनार्थ दिल्लीकडे कूच करतील .असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने एका पत्रकांतुन दिला आहे. दरम्यान
आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदाेलन करण्यात आले यावेळी सुनिल देवराव मुसळे(जिल्हाध्यक्ष,).प्रशांत येरणे (संघटनमंञी) .भिवराज सोनी( जिल्हा कोषाध्यक्ष ) संतोष दोरखंडे (जिल्हा सचिव)जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, शहर सचिव राजू कुडे, शहर सहसचिव अजय डुकरे ,शहर कोषाध्यक्ष सिकंदर सगोरे, बलारपूर शहर अध्यक्ष बलराम केसकर, मयूर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष, अंकुश राजूरकर,प्रफुल नैताम , सुरेंद्र फडके तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here