चांदागड शेतकरी उत्पादक कंपनी ची उद्या राजुरा येथे शेतकरी सभासद सभा आयोजित

0
330

चांदागड शेतकरी उत्पादक कंपनी ची उद्या राजुरा येथे शेतकरी सभासद सभा आयोजित

राजुरा, 17 जाने. : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत, उद्या दिनांक 18 जानेवारी ला दुपारी 12.30 वाजता चांदागड फॉर्मर प्रोड्युसर क.ली. राजुरा तर्फे शेतकरी सभासदाची सभा चांदागड शेतकरी उत्पादक कंपनी चे कार्यालय, गडचांदुर रोड, गुरुद्वारा जवळ राजुरा येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर सभेत नोडल अधिकारी (स्मार्ट) चंद्रपूर चे नंदकुमार घोडमारे, तालुका कृषी अधिकारी राजुरा चेतन चौव्हाण, मंडळ अधिकारी राजुरा विठ्ठल मकपल्ले हे उपस्थित राहून सर्व शेतकरी सभासदांना कृषी विभागाच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

कृषी विभागाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिककरण अभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान इत्यादी योजनांचा लाभ प्राधान्याने चांदागड शेतकरी उत्पादक कं. चे सभासद व शेतकरी यांना कसा देता येईल याबद्दल मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच महाडीबिटी पोर्टलवर सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

तरी सर्व सभासद व शेतकरी बांधवांनी सभेला उपस्थित राहून विविध योजनांची माहिती जाणुन घ्यावी. असे आवाहन चांदागड शेतकरी उत्पादक कंपनी राजुरा संचालक मंडळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here