अवैध दारू तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाया

0
1384

अवैध दारू तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर

एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाया

तिनं लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त ; दहा आरोपींवर गुन्हा दाखल

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून अवैध दारु तस्करी करीत असताना एकाच दिवशी गोंडपिपरी पोलिसांनी पाच कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.सध्या स्थितीत पोलीस कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नरत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी व्यस्त असतात.हीच संधी साधून अवैद्य दारू विक्रेते दारू तस्करी करीत आहेत.अशातच दि. १ शनिवारी दरूर घाटावर २ कारवाया, चेकदरूर घाटावर १ कारवाई, भंगाराम तळोधी येथील २ हातभट्टी वर एकाच दिवशी शनिवारी ठाणेदार संदीप धोबे, पीएसआय धर्मराज पटले यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत विविध ठिकाणी ५ कारवाया करीत अनिकेत रायपुरे, निखिल रायपुरे, रेकचंद रायपुरे, अमित तेलसे चारही राहणार फुर्डी हेटी. मलेश मोहूरले, नवीन इरगिला शिरपूर, गोलू सिडाम, संतोषी चंद्रगिरीवार, किशोर पेंदोर तिघेही भं तळोधी या आरोपींवर गुन्हा दाखल करून तिनं लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here