खेळाडूंनी सांघिक वृत्ती जोपासावी – निलेश ताजने

0
438

खेळाडूंनी सांघिक वृत्ती जोपासावी – निलेश ताजने

गडचांदूर :- कबड्डी सारख्या मातीतल्या खेळाविषयी महाराष्ट्रासह अवघ्या हिंदुस्थानात मोठे वेड लागले आहे. आधी गावखेड्यातील मैदानात खेळला जाणारा खेळ आज आंतरराष्टीय स्थरावर खेळला जात असून सतत लोकप्रियता वाढतच चालली असल्याने निश्चितचं याचा आनंद आहे. खेळाडूंनी आपल्या अंगी असलेले गुण या ठिकाणी चांगला खेळ दाखवून करावा त्यासोबतच मैदानात होणाऱ्या सर्वच सामन्यांमध्ये खेळाडूंनी सांघिक वृत्ती जोपासून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे. ज्यामुळे खेळात एक वेगळे पणा दिसून येईल व याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांना घेता येईल असे प्रतिपादन निलेश ताजने यांनी मौजा निमणी येथील शिव छत्रपती क्रीडामंडळ यांच्या वतीने आयोजीत पुरूषांचे भव्य रात्रकालीन कबड्डी सामन्यांच्या उद्धाटन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकर टेकाम माजी ग्राम पंचायत सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कारेकर ग्राम पंचायत सदस्य, प्रमुख उपस्थित निळकंठ कोरांगे‌ माजी सभापती चंद्रपूर, अतुल धोटे सरपंच निमनी, शिल्पा जगताप उपसरपंच निमनी, उमेश राजूरकर माजी उपसरपंच निमनी, गजू बुर्हान, अजिम बेग,निखिल भोंगळे, सुवर्णा बांदुरकर, पदमाकर पिदुरकर उपस्थित होते. यावेळी परिसरातील समस्त कबड्डीप्रेमी व मोठ्या संख्येने निमनी ग्रामवासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here