चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांच्या वाहनांवर कारवाया !
खनिकर्म अधिका-यांनी व पथकांनी कसली कंबर !

२७लाखांपेक्षा केला अधिक दंड वसूल !
पठाणपूरा व बिनबा गेट परिसरातुन हाेतेयं अवैध रेतीची वाहतूक ?
या कडेही तेवढेच लक्ष पुरवा ! जनतेची मागणी ! 💠🟢
चंद्रपूर🟣किरण घाटे 🟣🟡🟨 चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले हाेते .या बाबतीत जिल्ह्यातुन अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या हाेत्या . जनतेच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा खनिकर्म विभागातील पथकाचे खनिज निरीक्षक बंडु वरखेडे , अल्का खेडकर ,व दिलीप माेडक यांनी अवघ्या पाच महिण्यांत एकंदर २४अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवाया केल्या व संबधित वाहने मालकांकडुन २७लाख ३८हजार पाचशे चाळीस रुपये दंड वसूल करुन ताे खजिना दाखल केल्याचे खात्री लायक व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे .🟨🛑🟣💠दरम्यान जिल्ह्यातील केलेल्या या धडक कारवायांमुळे सध्या तरी रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे .🟡🛑🔵🌀याच पथकाने अवैध रेती वाहनांचे दाेन प्रकरणे दंडात्मक कारवाई साठी अनुक्रमे तहसिलदार पाेंभुर्णा व तहसिलदार बल्हारपूर यांचेकडे सुपुर्द केल्याचे खास सुत्राने या प्रतिनिधीस आज सांगितले .दिवस रात्र पथकांनी आपला जिव धाेक्यात टाकुन सदरहु धडक कारवायां केल्या आहे.तर दुसरी कडे महसुल विभागाच्या पथकाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , एस.डी.आे.राेहन घुगे व चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शना खाली व निदैशाप्रमाणे अवैध रेती वाहतुकींवर अंकुश ठेवण्यांसाठी तसेच दंडात्मक कारवायांकरीता माेहीम उघडली आहे. 🟩🟧🌀🟪या विभागाचे पथक सातत्याने चंद्रपूर तालुक्यात फिरत असल्याचे दिसून येते. उपराेक्त पथकात संजय गांधी निराधार याेजनेचे नायब तहसिलदार राजू धांडे ,नायब तहसिलदार जितेन्द्र गादेवार , नायब तहसीलदार सतिश साळवे मंडळ अधिकारी रमेश आवारी ,किशाेर नवले, , अशाेक मुसळे पटवारी वर्गं ,इत्तर महसुल अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने कार्यरत आहे . 🛑🔵🟣एकी कडे गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर तालुक्यात महसुल पथक तर दुसरीकडे जिल्ह्यात खनिकर्म अधिकारी तथा कर्मचारी पथक माेठ्या प्रमाणांत अवैध रेती वाहनांवर व रेती साठ्यांवर कारवाया करीत असल्यांचे एकंदरीत दिसून येते .🛑🟣🟨या दाेन्ही पथकांना वेळाेवेळी जिल्ह्यातील पाेलिस विभागाचे सहकार्य व मदत मिळत असल्याचे बाेलल्या जाते .🛑🟣🔷🟨चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट अवैध रेती तस्कारांचा अड्डा झाला असुन या भागातुन माेठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक हाेत असल्याची चर्चा जनतेत आहे मध्यंतरी चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांनी व त्यांचे महसुल पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे एकाच दिवशी भल्या सकाळी जिव धाेक्यात घालून पांच ते सहा वाहने पकडली हाेती नियमाप्रमाणे त्यांचेवर रितसर दंडात्मक कारवाया देखिल झाल्या .🟥🔷🟪☀️💠आता काही दिवस लाेटत नाही ताेच परत येथील काही माहिर अवैध रेती तस्करांनी (मुख्य दिशेवर पाळत ठेवत)माेठ्या हिंमतीने रेती नेण्यांचा सपाटा सुरु केल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे . त्यांचा पहाटे रेती नेण्यांचा उपद्रव नित्य सुरु असल्याचे विश्वासनिय सुत्राने या प्रतिनिधीस सांगितले .हाच प्रकार बिनबा गेट परिसरात देखिल रात्रीला सुरु असल्याचे नागरिकात खुलेआम बाेलल्या जात आहे अश्या अवैध रेती तस्कारांना (वाहनांसह) पकडणे हे महसुल व खनिकर्म पथक यांचेसाठी एक प्रकारचे आव्हानच आहे .🔶🟨🟥🔵या प्रकाराकडे ते कश्या प्रकारे ( हे दाेन्ही पथक) लक्ष पुरविते या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .सध्याच्या घडीला या दाेन्ही विभागाचे काम समाधारक आहे हे मात्र तेवढेच खरे आहे .