कोरोना जनजागृती काव्यधारा – ३

0
556

कोरोना जनजागृती काव्यधारा – ३
कवी – मा.धनंजय साळवे
गटविकास अधिकारी, पोंभुर्णा

 

माझे असणे, माझे हसणे


गावोगावी गल्लोगल्ली
कोरोनाचे थैमान
आरोग्य तपासणीनेच
वाचेल जीवनमान

‘मला काय होणार …!’
या भ्रमात नका राहू
कोरोनाने प्राण घेण्या
पसरले आपले बाहू

शंका कुशंका लोकांच्या
मनात आहे लपली
शासनाने जनजागृतीची
भावना आहे जपली

आणू नका हो
अडचणीत उगा कुटुंबाला
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
सांगा प्रत्येकाला

आरोग्यसंपन्न कुटुंबातच
आहे आपली उन्नती
आज नाही पण उद्या
साधू आपली प्रगती

माझे कुटुंबाचे…पथक
जर आले तुमच्या दारी
तपासणी करा कुटुंबाची
हिच आपली जबाबदारी

कवी -एस.धनंजय ,चंद्रपूर
(गटविकास अधिकारी, पोंभुर्णा)
संपर्क – 96232 10159

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here