प्रहार च्या पाठपुराव्याने चार कामगारांना चार महिन्या नंतर घेतले कामावर

0
466

प्रहार च्या पाठपुराव्याने चार कामगारांना चार महिन्या नंतर घेतले कामावर
बिडकर यांनी केली होती फेर चौकशी ची मागणी

कोरपना प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर येथील महापारेषण कार्यालयात चार कामगार ठेकेदारी पद्धतीवर काम करत असताना उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले या कामगारांनी याची तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली यामध्ये अधिकारी यांनी पैसे घेतले व महिन्याकाठी पैसे देण्याची मागणी केली अशी तक्रार कामगारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली मात्र या तक्रारीवर एक तर्फी चौकशी करण्यात आली यावर चारही कामगारांना दोषी ठरवून त्यांना कामावरून कमी करण्यात आले त्यानंतर या कामगारांनी अनेक नेते व पक्षांकडे तक्रारी करून न्याय मागितला पण त्यांना कुठेही यांची मदत मिळाली नाही यानंतर त्यांना कोणी तरी प्रहार चे सतीश बिडकर यांची माहिती दिली ते लगेचच बिडकर पर्यंत पोहोचले त्यांना सर्व आपबिती सांगितली हे ऐकून बिडकर यांनी तात्काळ फेर चौकशीसाठी चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला संबंधित अधिकाऱ्याला फोन करून या बद्दल माहिती दिली व या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी केली त्यानंतर पेर चौकशीसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली हा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त यांना पाठविण्यात आला व बिडकर यांनी विभागीय आयुक्तांशी फोनवर संपर्क करून चारही कामगारांना परत कामावर घेण्याबाबत विनंती केली सदर कामगारांना कामावर घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले व कामगारांना परत कामावर घेन्याचे आदेश देण्यात आले जो न्याय कामगारांना चार महिन्यात मिळाला नाही तो न्याय बिडकर यांनी पंधरा दिवसात मिळवून दिला याबद्दल कामगारांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला प्रहार हा सेवाभावी रुग्णसेवा समाज सेवा करणारा पक्ष असून ज्यांचे काम होत नाही त्यांनी शेवटी प्रहरला मात्र नक्की आठवा अशा व्यक्तींचे काम प्रहार मात्र नक्कीच करून देतील असे बिडकर यांनी बोलून दाखविले.

 

आम्हाला चार महिन्या पूर्वी कामावरून काढले आमची कोणतीही चूक नसताना अधिकाऱ्यांनी पैसे घेतले व मागितल्या मुळे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली यामुळे आम्हाला कामावरून कमी करण्यात आले आम्ही अनेकांकडे जाऊन मदत मागितली पण आम्हाला ते मिळाली नाही शेवटी आम्हाला प्रहार चे बिडकर यांची माहिती मिळाली आम्ही प्रहारचे बिडकर यांना आमची आपबिती सांगितली यावर कोणतीही वेळ न गमावता वरिष्ठ अधिकऱ्यांकडे फेर चौकशीचे मागणी केली व अम्हाला न्याय मिळाला आम्हाला कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले तसे पत्र सुद्धा आम्हला प्राप्त झाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here