विवेकानंद युवा मंडळाने केला महिलांचा सत्कार

0
555

विवेकानंद युवा मंडळाने केला महिलांचा सत्कार

आवाळपूर :- महीला दिनाचे अवचित्य साधून विवेकानंद युवा मंडळ नांदाचा वतीने ग्रामपंचायत सदस्य महिलांचा सत्कार करण्यात आला. विवेकानंद युवा मंडळ हे मागील अनेक वर्षापासून नांदा या गावात कार्यरत असून विविध समाजउपयोगी कार्यक्रम घेत असतात.
महिला दिनाचे अवचित्य साधून ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या व पुरुषाचा खांद्याला – खांदा लावून काम करणाऱ्या ग्रामपंचायत महिला सदस्य यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कोरोना चे भान ठेवून युवकांनी मोठा कार्यक्रम न घेता महिलांचा सदस्यांचा घरपोच जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here