शाळेत ५०% अनुपस्थिती असलेल्या शिक्षकांना बडतर्फ करा……

0
469

शाळेत ५०% अनुपस्थिती असलेल्या शिक्षकांना बडतर्फ करा……

शिवसेनेचे गट विकास अधिकारी यांना निवेदन

पोंभूर्णा प्रतिनिधी
देशभरात कोरोनाची महामारी चालू असून मोठी दहशत यामुळे निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाबाबत भविष्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य असतानाचा अध्यादेश शासनाच्या वतीने पारित करण्यात आला आहे. असे असुनही सदर शिक्षकांकडून हे नियम पायदळी तुडविल्या जात आहे.
तालुक्यातील अनेक शिक्षक शाळेत गैरहजर राहत असल्याने अशा शिक्षकांची चौकशी करित सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे असे निवेदन शिवसेनेचे विजय वासेकर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here