कोरोना जनजागृती काव्यधारा – १६

0
389

कोरोना जनजागृती काव्यधारा – १६

कवी – बी.सी.नगराळे, चंद्रपूर

कविता / अभंग : कशाला पंढरी?

माझे गा कुटुंब, माझा पांडुरंग |
सेवेत मी दंग, रात्रंदिन ||

घेतली मी शीरी, ती जबाबदारी |
झालो वारकरी, कुटुंबाचा ||

विठ्ठल भेटीची, जसी आहे ओढ |
तेवढाची गोड, संसारही ||

शरिराच्या माझ्या, होवो भले काड्या |
वाजवीतो टाळ्या, भक्तीभावे ||

काम कर्तव्यात, पुर्ण समर्पण |
हेच गा भजण, रोज गातो ||

विठ्ठल गा घरी, विठ्ठल गा उरी |
कशाला पंढरी, हवी आता ||

कवी – बी सी नगराळे, चंद्रपूर
संपर्क- ७४४७३६७७९८

 

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here