साईशांती नगरात महाआरोग्य शिबिराला महाप्रचंड प्रतिसाद, 728 रुग्णांनी घेतला लाभ

0
259

साईशांती नगरात महाआरोग्य शिबिराला महाप्रचंड प्रतिसाद, 728 रुग्णांनी घेतला लाभ

कोरपना (ता. प्र.) : सामाजिक भान जपत समाजाला काही देणं लागतं या उद्देशाने व गणेश उत्सवाचे औचित्य साधत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगली मेघे व साई शांती युवा गणेश मंडळ गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने साई शांती नगरी येथे महा आरोग्य शिबिर घेण्यात आले होते.

व हे आरोग्य शिबिराला घटक म्हणून बीबी येथील सामाजिक कार्यकर्ते अस्थीतज्ञ डॉक्टर गिरीधर काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक अरविंद डोहे प्रमुख अतिथी डॉ. स्वप्निल टेंभे, डॉ निखिलेश,डॉ. बुरान, मुरलीधर उमाटे हे उपस्थिती होते.

महा आरोग्य शिबिरात सर्वरोग निदान व उपचार देखील करण्यात आले यावी 728 नागरिकांनी तपासणी केली, 73 नागरिकांवर मेघे सावंगी येथे उपचार होणार आहे. 45 नागरिकांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी याचे वार्षिक उपचार कार्ड काढले. तर 103 नागरिकांनी आभा कार्ड काढून घेतले.

सदर महा आरोग्य शिबिर चे संचालन नुतेश डाखरे प्रास्ताविक मंडळाचे संयोजक वैभव राव यांनी केले तर आभार घनश्याम पाचभाई यांनी मानले. सदर महा आरोग्य शिबिर यशस्वितेसाठी साई शांती युवक मंडळाचा सदस्यांनी अथक परिश्रम केले. यामधे सुमित नागे, नीलेश चीने, अक्षय मेश्राम, आकाश गायकवाड, विशाल राव, सुहास बोंडे, सूरज बोबडे, संकेत बोढे,अतूल बोबडे, दत्तु पानघाटे,वैभव पोतनुरवार, साहील नागे , अक्षय जाधव, क्रिश वैद्य,पवण चौहान, नीरज मालेकर, गिरीश धवणे आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here