राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन सूरज ठाकरे १३ ऑक्टोंबर पासून तहसील कार्यालय राजुरा समोर बसणार उपोषणास…

0
288

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन सूरज ठाकरे १३ ऑक्टोंबर पासून तहसील कार्यालय राजुरा समोर बसणार उपोषणास…

गेल्या अनेक वर्षांपासून राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्याच्या समस्या या दिवसेंदिवस वाढत आहेत क्षेत्रातील अनेक लोकांना खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला आहे. ठाकरे यांनी बरेचदा या संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ बॅनर लावून या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु यावर प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे.
राजुरा कोरपणा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी असून त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारावर प्रथम अधिकार हा स्थानिक तरुणांचा असायला हवा ही मागणी घेऊन ठाकरे यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. परंतु याबाबत स्थानिक वेकोली प्रशासनाची भुमिका ही नेहमीच अरेरावीची असल्याने स्थानिकांना वेकोली अंतर्गत खदानीनमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये 80 टक्के वाटा हा देण्यात यावा याकरता वेकोलीने तसा नियमच बनवावा असा आग्रह घेऊन सुरज ठाकरे हे दिनांक १३/१०/२३ पासून राजुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. सुरज ठाकरे यांनी एकंदर १० मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या असून त्या दिनांक १२/१०/२३ पर्यंत पूर्ण न झाल्यास ठाकरे हे दिनांक १३/१०/२३ पासून उपोषणास सुरुवात करतील.

🔹 त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत…
१) राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिमेंट उद्योग, व कोळसा खाणींमध्ये व इतर उद्योगांमध्ये किमान ८०% रोजगार ( नोकरी ) हा स्थानिकांनाच मिळावा यासाठी कायदा करावा.

२) राजुरा विधानसभा क्षेत्रातील नगरपंचायत व नगरपरिषदेमध्ये काम करीत असलेल्या तसेच ठेका पद्धती अंतर्गत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या रोजीनुसार रोजी मिळावी व कामगार कायद्या अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात याव्यात तसेच त्यांचे पी. एफ व ई.पी.एफ तात्काळ भरून देण्यात यावे.

३) राजुरा विधानसभा क्षेत्रातील तालुक्याला, शहरांना व राज्यांना जोडणारे महत्त्वपूर्ण सार्वजनिक रहदारीचे सर्व रस्ते मग ते स्थानिक रस्ते प्रशासना अंतर्गत असोत (PWD ) अथवा राष्ट्रीय राज्य महामार्ग अंतर्गत येत असतो (NHAI ) हे तात्काळ सुधारावेत व कंत्राटदाराकडून रस्ते खराब झाल्यास २४ तासाच्या आत त्यात सुधारणा केली जाईल असे हमीपत्र घ्यावे, तसेच या रस्त्यांवर सदर रस्ता किती किलोमीटर पर्यंत कुणाच्या अधिकार क्षेत्रात येतो व संपर्क अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ठेकेदाराचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद असलेले फलक लावावेत.

४) विधानसभा क्षेत्रामधील विविध कंपन्या व कोळसाखानी अंतर्गत होत असलेली अवजड वाहतूक ही रात्रीच करावी (अशा सार्वजनिक रस्त्यांवरून ज्या ठिकाणी सामान्य जनतेचा वावर व रहदारी अधिक आहे).

५) शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या समस्त शासकीय योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता व त्याची अंमलबजावणी करण्याकरता महसूल विभागाने विशेष पथकाची स्थापना करावी, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमीत परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ योजनेनुसार 50 हजार रुपये द्यावेत. तथा अतिवृष्टीमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ करण्यात आला असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून खऱ्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात यावी. तथा कर्जाचे पुनर्गठन शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय करू नये.

६) राजुरा पोलीस स्टेशन येथे वादग्रस्त पोलीस शिपाई संदीप बुरडकर यांची केलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी.

७) विरूर स्टेशन रोड असिफाबाद मार्ग तालुका राजुरा येथे शाळेचा, चर्च चा तथा गावकऱ्यांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणी कार्ड रूम/ कार्ड क्लब (परवाना क्र- GB/D-VII/T-2/2019/3) नुसार क्लबला परवानगी देण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी.

८) पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल धुळे यांच्या कडे अवैध संपत्ती असल्या संदर्भात तक्रार केली आहे परंतु त्यावर शासनाने अद्याप कुठलीही कार्यवाही केले नाही, त्यावर कार्यवाही करून स्वप्निल धुळे यांना निलंबित करण्यात यावे तसेच त्यांची अवैध मार्गाने जमवलेली संपत्ती जप्त करण्यात यावी.

९) ताडोबा अंधारी वाद्य प्रकल्प क्षेत्रामध्ये असलेल्या ओपन जिप्सी या एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावाने २-३ एकापेक्षा अधिक जिप्सी असल्यास संदर्भात वन विभागाला दिनांक- ०२/जानेवारी/२०२३ रोजी दिले होते ज्यामध्ये “एक कुटुंब एक रोजगार योजना” राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी देण्यात यावी ही प्रलंबित मागणी पूर्ण करण्यात यावी.

१०) राजुरा तालुक्यातील पंचाळा गाव येथील गावकऱ्यांना पट्टे देण्यासंदर्भात दिनांक – १७/११/२०२१ रोजी व दिनांक- २९/०८/२०२३ रोजी पट्टे मिळण्यासंदर्भात गावकऱ्यांच्या यादीत सह दिल्लीतल्या निवेदनामधील मागणी पूर्ण करून देण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here