राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदी मयूर एकरे यांची नियुक्ती

0
253

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदी मयूर एकरे यांची नियुक्ती


कोरपना प्रतिनिधी
औद्योगिक नगरी व सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालय च्या सभागृहात आढावा बैठक आयोजन केलं होतं यात राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीचे अध्यक्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी मयुर एकरे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

राज्यात शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले असून आपल्या पक्षा अंतर्गत बांधणी सुरू आहे. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या सभागृह येथे बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी युवा नेते मयूर एकरे यांची कोरपणा “तालुका अध्यक्ष” म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत पक्षाची भूमिका तथा पक्षाच्या संघटन वाढीसाठी चर्चा करण्यात आली.

त्यावेळी प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, युवक विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड, पक्ष विधानसभा निरीक्षक रफीक नीजामी प्रवीण कोल्हे वामन भिवापूरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष आकाश वराटे सदानंद गिरी आसिफ शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here