बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन

0
257

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन


बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रगडे यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी आजाद बागेजवळ असलेल्या त्यांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथिल कार्यक्रमात उपस्थित होत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रगडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी बाळू खोब्रागडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजीत शाहा, प्रतिक डोर्लीकर, शालीनी भगत, सुलभ खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती निमित्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला आणि स्मारकाला माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण केली. बॅरिस्टर राजाभाऊ यांनी समर्थपणे दलित, पीडित, गरीब ,शेतकरी, कष्टकरी यांच्या उत्थानासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी फक्त रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलने केले नाहीत तर संसदेत सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून ते मार्गी लावले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे १८ वर्ष राज्यसभेचे खासदार राहिले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करा हे शब्द त्यांनी मनात पक्के ठेवत स्वतःला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत झोकून दिले. पूढे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अशा मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती साजरी करत असतांना त्यांनी समाजाला दिलेला विचार आत्मसाद केला पाहिजे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार होते. ते या चळवळीतील महान योध्दा होते. अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here