अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना घरे बांधून मिळेपर्यंत घरभाडे द्या

0
280

अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना घरे बांधून मिळेपर्यंत घरभाडे द्या

घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना घरे बांधून मिळेपर्यंत घरभाडे देण्यात यावे अशी मागणी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भूस्खलनग्रस्तांतर्फे मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी न. प. चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

घुग्घुस येथील अमराई वार्डात दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी भूस्खलन झाले. अख्खे घर जमिनीत गाडल्या गेले. अनेक घरांना तडे गेले. १६९ कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आले. १६९ कुटुंब घुग्घुस शहरात इतरत्र राहायला गेली.

या घरांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वेकोलिच्या माध्यमातून पहिल्या सहा महिन्याचे सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंतचे घरभाडे मिळाले. मा. ना. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत जमिनीचे पट्टे व घरे बांधून देण्याचे शासनाकडून आश्वासन देण्यात आले.

मा. ना. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून वेकोलितर्फे पुढील मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्याचे घरभाडे प्राप्त झाले. एकूण एका वर्षाचे घरभाडे मिळाले. शासनातर्फे घरे बांधून देण्याच्या पुढील प्रक्रियेत मा. ना. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र शासन तसेच मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील मंत्रालयात भूस्खलनग्रस्तांच्या शिष्टमंडळा सोबत बैठक पार पडली.

यात लवकरात लवकर जमिनीचे पट्टे व घरे देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांनी दिले. घरे बांधून मिळेपर्यंत वेकोलिने घरभाडे देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी मोठ्या संख्येत अमराई वार्डातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here