वणी शहरात घाण पाण्याचा पुरवठा…

145

वणी शहरात घाण पाण्याचा पुरवठा…

मागील अनेक वर्षापासून वणी शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून दररोज पाणी वणीकर जनतेला मिळत नाही हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न वणीकर जनतेला भोगाव लागत आहे. वणी शहरात काँग्रेस ची सत्ता होती तरी पाणी प्रश्न होताच, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली तरी पाणी प्रश्न संपला नाही, त्यानंतर संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि वणी नगर परिषद मध्ये पण भाजपची सत्ता आली तरी पाणी प्रश्न संपला नाही उलट वाढला आहे. वणी शहर नगर परिषदेत नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या योजनेचा कायमचा प्रश्न तो प्रश्नच आहे. मागील अनेक वर्षापासून वणीची जीवनदायिनी निरगुडा नदी मध्ये वणी शहरातील सांडपाणी, गटाराचं, संडासाचं पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्याने तेच घाण पाणी वणीकर जनतेला पिण्यासाठी व दररोज वापरण्याकरिता त्याचा पुरवठा करण्यात येतो. गरीब जनता तेच पाणी पितात व वापरतात, अनेक नागरिकांनी पिवळे पाणी येते म्हणून तक्रारी केल्या पण काहीच उपयोग झाला नाही. अनेक नागरिक तर विकत पिण्याचे पाणी घेतात व वापरण्यासाठी घाण पाणी उपयोगात आणतात. आता जनतेच्या आरोग्याशी खेळणारे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार का ? या यापूर्वी आलेले अनेक मुख्याधिकारी यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. तसेच आत्ताचे विद्यमान वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा यांनी वणी शहरात घाण पाणी पुरवठा सुरूच ठेवला आहे. वणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी स्वतःची जबाबदारी काय आहे. हे त्यांना माहीत असून तरीसुद्धा ते या गंभीर प्रश्नापासून पळत आहे. यात कोणतीही शंका नाही पाणी माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून तातडीची व दैनंदिन गरजेचा घटक आहे. वनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी हा प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कंत्राट दाराला पोटाशी घातले असून वणीकर जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने निष्क्रिय असलेल्या मुख्यधिकारी अभिजित वायकोस यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या कायदेशीर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कारण वणी शहरातील पाणीपुरवठा हा दोन दिवसानंतर होत असून अत्यंत घाणेरडे पाणी येत असल्याने शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य खूपच धोक्यात आहे. अनेकांचे आरोग्य पाण्यामुळे खराब झालेले आहे. त्यामुळे हा प्रश्न वणी नगर परिषदेचा नसून संपूर्ण जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा झालेला आहे. वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस व संबंधित पाणी पुरवठा विभागाअंतर्गत येणारे सर्व कर्मचारी अधिकारी कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या वर गुन्हे दाखल करा अशी प्रसिद्धी पत्रकातून प्रखर, कणखर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता सागर मुने यांनी मागणी केली आहे. हा प्रश्न न संपल्यास संपूर्ण वणी शहर या आंदोलनात सहभागी होणार असे सांगितले आहे.

advt