डाँक्टरांच्या अथक प्रयत्ना नंतरही अनिल खनके यांचा जीवन प्रवास अखेर थांबला!चंद्रपूरातील खनके कुटुंबाचा आधार स्तंभ हरपला!

0
651

डाँक्टरांच्या अथक प्रयत्ना नंतरही अनिल खनके यांचा जीवन प्रवास अखेर थांबला!चंद्रपूरातील खनके कुटुंबाचा आधार स्तंभ हरपला!

चंद्रपूर 🟣☀️किरण घाटे 🟣☀️चंद्रपूर नगरीत नव्हे तरं अख्या चंद्रपूर जिल्ह्यात मित्रमंडळीत सर्वत्र परीचित असलेले अनिल राघाेबाजी खनके यांची रविवार दि.२७सप्टेंबरला पहाटे ४वाजुन ३०मिनिटांनी उपचार दरम्यान प्राणज्याेत मालवली.स्थानिक विठ्ठल मंदीर वार्ड स्थित सेवानिवृत्त तहसिलदार स्व .निळकंठराव घाटे यांचे ते जावई हाेत .म्रूत्यु समयी अनिल खनके यांचे वय ६९वर्षाचे हाेते.काेराेनाचे लक्षण आढळुण आल्यामुळे त्यांना सहा दिवसापुर्वि शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यांत आले हाेते .उपचारांची डाँक्टर मंडळी कडुन प्रक्रिया आरंभ असतांना त्यांना चार दिवसात आराम देखिल झाला हाेता .येत्या एक दाेन दिवसात त्यांना रुग्णालयांतुन सुट्टी देण्यांत येणार हाेती .परंतु शनिवारच्या दुपार पासुन त्यांचे प्रक्रूतीत परत एकदा बिघाड झाला व तेथुनच त्यांची प्रक्रूती अधिक बिघडत गेली .शनिवारच्या रात्री अधिक त्रास त्यांना सहन करावा लागला. शेवटी रविवारी पहाटेला त्यांनी या जगाचा कायमचा निराेप घेतला .🟣☀️🌼स्व. अनिल खनके चंद्रपूरातील स्थानिक पठाणपुरा वार्ड मुळ निवासी ! त्यांचे वडीलांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती हा हाेता.! वडीलांचे निधनानंतर खनके कुटुंबाची धुरा ख-या अर्थाने त्यांनी व त्यांचे माेठ्या बंधुनी यशस्विरित्या सांभाळली हाेती.एवढ्या माेठ्या खनके कुटुंबाचे आधार स्तंभ एका अर्थाने स्व. अनिल खनके हे हाेते .🟣☀️🔷महाविद्यालयीन जिवना पासुन त्यांना सामाजिक कार्याची आवड हाेती .तैलिक समाजातील प्रत्येक कार्यक्रमात ते जातीने हजर राहत .नंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली .महाविद्यालयीन जिवनात त्यांनी पँनल तैयार करुन महाविद्यालयीन निवडणुका लढविल्या त्यात ते यशस्वि देखिल झाले .येथेच न थांबता स्व. अनिल खनके यांनी आपल्या अनुभवाच्या भराेश्यावर न.प.वार्ड सदस्याची कांग्रेस (इंकाँ)तर्फे निवडणुक लढवली हाेती . ती निवडणुक जिंकुन सुध्दा दाखवली हाेती .महाविद्यालयीन विद्यार्थी नेता म्हणुन चंद्रपूरचे भूतपूर्व खासदार नरेश बाबु पुगलिया यांनी त्यांचा त्या काळी विश्वास संपादन केला हाेता हे विशेष !अनेक वर्ष राजकारणाच्या निमित्ताने खनके यांनी पुगलियांच्या सहवासात घालविली हाेती .चंद्रपूर मनपाचे भूतपुर्व उपाध्यक्ष स्व. अनिल खनके यांनी लाेक आग्रहा खातिर आपली पत्नी शारदा खनके हिला सुध्दा नगर परिषद निवणुक मैदानात उतरविले हाेते .शारदा ताईने मतदारांच्या अमाप विश्वासपाेटी ती निवडणुक जिंकुन दाखवली हाेती .सध्या स्व. अनिल खनके काे.आँ.बँकेच्या संचालक मंडळात कार्यरत हाेते समाज सेवा व राजकारणा साेबतच त्यांना वाचनाची अमाप आवड हाेती .चंद्रपूरातील विनाेदी एक्सप्रेस या दिपाावली अंकाचे ते मुख्य संपादक हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here