पाटागुडा गावात अवैध धंदे जोमात…

127

पाटागुडा गावात अवैध धंदे जोमात…

जिवती :- तालुक्यातील पाटागुडा येथे अवैध महोफुळ व देशी दारु राजरोसपणे विक्री होत आहे. अवैधरित्या दारु विक्री करुन तरुणांना व्यसनाधिन करून सोडले आहे. दारु पिऊन गावातील गल्लीत लोळने, शिवीगाळ करणे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना व शाळेतील मुला- मुलींना याबाबीचा त्रास होत आहे. अवैध दारु विक्रीमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले असून पती-पत्नी आई-वडील व मुलांमधे हाणामारी यामुळे महिला वर्गास दारु पिणाऱ्यामुळे त्रास होत असुन कामधंदा न करता आर्थीक हानी होत आहे.

अवैध दारु विक्रेते यांना गावातील प्रतिष्ठीत मंडळीनी दारु विक्री बंद करण्याचे वारंवार सांगुनही ऐकत नाही. अवैध दारु चढ्याभावाने विक्री करुन

वरकमई वाढलेली असल्याने ते कोनालाही जुमानत नाही. पैशाच्या ताकदीवर गावात दशहत व गुंडप्रवृती बळावत आहे.

पाटागुडा येथील अवैध दारु बंद करण्यात यावी यासाठी प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी पोलिस अधीक्षक साहेब चंद्रपूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, तहसीलदार साहेब जिवती, ठोणेदार साहेब पो.स्टे टेकामांडवा, सरपंच ग्राम पंचायत चिखली (खु) यांना निवेदन देण्यात आले आहे.

अवैध दारु विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई व कायमस्वरूपी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी व महीलांना व नागरीकांना होनाऱ्या त्रासापासुन मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

advt