युवा संकल्प संस्थेने केली पक्षांकरीता पाण्याची व्यवस्था

0
536

युवा संकल्प संस्थेने केली पक्षांकरीता पाण्याची व्यवस्था

सुखसागर झाडे । युवा संकल्प संस्था ही सद्या गडचिरोली जिल्हामध्ये नावलौकिक प्राप्त करीत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवीत असून त्यांच्या कामाची स्तुती सर्व गावां गावांमध्ये सुरू आहे. तसेच उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे सर्व भागात पाण्याचा तुटवडा पडत असतो. उन्हाच्या कडाक्याने वातावरण तापलेलं असतं त्यात मानव तर आपली काळजी घेऊ शकतो परंतु पक्षी व प्राणी यांच कायं होईल या विचाराने संपूर्ण गाव परीसरा मध्ये पक्षानं साठी दोनशे बॉटल ला कापून त्यामध्ये मध्ये पाणी भरून झाडांवर ठेवण्यात आले. जेणेकरून पक्षांना उन्हाळ्यात पाणी पिण्याची व्यवस्था करून दिली. प्रत्येकांनी आप-आपल्या गावा मध्ये अश्या प्रकारचे उपक्रम राबवावे असा संदेश लोकांना दिला. त्यावेळी युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल वैरागडे, प्रशांत कुसराम , मनोज तुमडे, शिवा, व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here