महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील शिक्षिका सलमा कुरेशी “आदर्श शिक्षक पुरस्कार” ने सन्मानित

0
431

महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील शिक्षिका सलमा कुरेशी “आदर्श शिक्षक पुरस्कार” ने सन्मानित

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांना आदर्श मानणारी महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथिल क्रियाशील व उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी यांना जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिनांक 2 ऑक्टोबर 2022 ला पीडब्लूडी हॉल बल्लारपूर येथे “आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा” जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा आयोजित करण्यात आला होता. या वर्षी कोरपना, जिवती आणि राजुरा येथील 22 उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

याअंतर्गत सोनूर्ली येथील विद्यार्थी प्रिय, विज्ञान शिक्षिका सलमा कुरेशी यांनी अनेक वर्षांपासून आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व विज्ञान प्रदर्शनी, विज्ञान नाटिका, स्पर्धा परीक्षा, इंस्पायर अवार्ड इत्यादी अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पणे केले आहे व प्रत्येक वेळी बक्षिसे मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे.

सलमा कुरेशी यांना “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा” याअंतर्गत महाराष्ट्रशासनाने सन्मानित केले होते. तसेच 2018 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत ”जिल्हा स्तरावर बेस्ट इंनोवेटिव्ह टिचर अवॉर्ड” आणि स्टूडेंट फोरम कोरपना यांच्या कडून 2019 मध्ये “जीवन गौरव पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले होते.

तसेच मागील वर्षी झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धे मध्ये जिल्ह्यातुन द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव लौकिक केले.

त्यांचे विद्यार्थ्यांप्रति असलेले समर्पण, शाळेबद्दल असलेली आस्था आणि कर्तव्या बद्दल प्रामाणिकता यामुळेच त्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा “आयडियल टीचर पुरस्कार” ने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे चेअर पर्सन सुशीला पुररेडीवार, प्रमुख अतिथी झोन प्रेसिडेंट सौरभ बरडीया, विशेष अतिथी अनुप गांधी व बक्षीस वितरक बल्लारपूर येथील प्रख्यात डॉक्टर राजनीताई हजारे, झोन डायरेक्टर प्रोग्राम सुष्मा शुक्ला, सचिव मधूस्मिता पाढी, झोन ऑफिसर स्मृती व्यवहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय चमू ने पूर्ण सहयोग दिले.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे, तसेच महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील मुख्याध्यापक रमेश हनुमंते, शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here