शासकीय ग्रामीण रुग्णालयात औषध साठा उपलब्ध करा

0
341

शासकीय ग्रामीण रुग्णालयात औषध साठा उपलब्ध करा

काँग्रेसची जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातुन मागणी

घुग्घूस : हा शहर औद्योगिक शहर मिनी इंडिया म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. शहरात देशभरातील कामगार मजूर येथे वास्तव्यास राहतात
खाजगी उपचार हा सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्याने शहरातील नागरिक हे मोठया संख्येने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जातात. रुग्णालयात औषध नसल्याची अनेक तक्रारी नागरिकांनी काँग्रेस कार्यलयात केल्या.

नागरिकांच्या समस्येची दखल घेत काँग्रेस शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देवून सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी केलेली तक्रार ही शंभर टक्के खरी असून याचा त्रास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यां सह कर्मचाऱ्यांना ही भोगावा लागत आहे.

जिल्हा पातळीवरून रुग्णालयात अती आवश्यक औषध ही पुरेश्या प्रमाणात पाठविण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुग्घूस शहर हा प्रदूषणात राज्यात प्रथम क्रमांकावर येतो अश्या शहराला औषध पुरवठा न करणे हा गंभीर गुन्हा आहे.

नागरिकांना हक्काचा औषधसाठा मिळावा याकरिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हापरिषद चंद्रपूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदनातुन खालील औषधी तातळीने उपलब्ध मागणी केली आहे.

तुटवडा असलेल्या औषधी
1)आय. व्ही.एन.एस 100 मिली,
2)इंजेक्शन ऑक्सिटॉक्सीन
3)आय. वी.एन.एस.500 मिली
4) टॅब टेलमिसरटन 40
5) ओ.आर. एस पावडर
6) टॅब पॅनटॉप 40
7) टॅब ग्लिमप्रिडे 2 एम. जी.
8) टॅब एमवर + क्लाव 62
9) टॅब व्हिटॅमिन बिकोपली
10) टॅब मेट्रोनिडझोल 400 एम.जी
11) सायरप एमवे + क्लाव
12) सायरप सिट्रीझाईन
13) सिप्रो आय ड्रॉप
14) सायरप मल्टिव्हिटामिन
15) कॅप अँप्रिसिलिन 500
16) टॅब लॅबीटलोल 100
17) टॅब पूवे या औषधी तात्काळ उपलब्ध झाल्या पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात रोशन दंतालवार,अलीम शेख, मोसीम शेख,रोहित डाकूर, नुरुल सिद्दिकी,अरविंद चहांदे,अनुप भंडारी,रफिक शेख,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,साहिल सैय्यद,दिपक पेंदोर,कपिल गोगला,अंकुश सपाटे, व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here