पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

0
227

पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

 

राजुरा पोलिस स्टेशन येथील पोलिस वाहन चालक या पदावर कार्यरत असलेले श्रीमंत धोंडीबा कदम (वय 33 वर्ष) यांनी आपल्या किरायाच्या घरात चुनाभट्टी वॉर्ड राजुरा येथे सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास बेडरूम मध्ये सीलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिक व घरमालकाला सविस्तर विचारले असता अशी माहिती मिळाली की, तो मानसिक रित्या खूपच खचला होता. तो दारूच्या आहारी गेला असल्यामुळे नेहमी नशेत असायचा. त्याची दोन तीन महिन्यापासून पत्नी आपल्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली होती. जेव्हा तो दारू सोडेल तेव्हाच ती घरी येईल असे त्याच्या पत्नीने सांगितले होते. पण आज पहाटे 3 वाजता पासून तो विचित्र वागू लागला आणि शेवटी त्याने आपली जीवनयात्रा सकाळी 10.30 वाजता गळफास घेऊन संपवली. दारू मूळे त्याचा नाहक जीव गेल्यामुळे वॉर्डातील नागरिक व शेजारी हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्याचे मुळगाव पहाड वणी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here