ना हार ना जीत…

0
411

ना हार ना जीत…
 

संगमनेर : काँग्रेस पक्ष दुबळा होईल असे मोदींचे धोरण आहे, ते असणे ही साहजिक आहे. काँग्रेस दुबळी झाली की बाकी पक्ष कधी ही खिशात घालू, अन् जोरदार हुकूमशाही आणू, हा त्यांचा कयास आहे. पण ते त्यांना शक्य नाही. मतदार पंजाब सारख्या ठिकाणी एकच आमदार मोदींचा निवडून देतात व आप ला पदरात घेतात हे विसरून चालणार नाही….

युपी मध्ये मायावती ने नक्कीच गडबड केली, त्यांचे निवडणुकीत न बोलणे हे बरेच सांगून जाते. मायावतींची वोटबँक सरळ सरळ भाजप कडे झुक्कवली गेली. हे सर्व पूर्व नियोजित असावे असा तरी आता अंदाज बांधता आला. हा लोकशाही ला मोठा धोका आहे, हे सेटलराम गणित आहे. योगी हे ठाकूर यांच्या आडून ब्राम्हण चा काटा काढतात असे खूप सांगितले गेले. तरी ही बहुसंख्य ब्राह्मण यांनी मोदींना पसंती दिली.

ओबीसी समाज मोदीच्या मागे फक्त तेल, गहू तांदूळ मोफत दिले म्हणून राहिला. भाजप च्या जागा पन्नासहून कमी झाल्या. गोदी मीडियाने मात्र या वर कुठला ही झोत टाकला नाही. अखिलेश ची पार्टी एकाकी लढली. पावनखिंड लढावी तशी त्यांनी बाजी प्रभू देशपांडे सारखा युपी चा किल्ला लढवला… मोठ्या प्रमाणात सभांची गर्दी जनतेचा पाठिंबा ते मता मध्ये रुपांतरीत का करू शकले नाही हे अभ्यासले पाहिजे.

लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष हवाच तो त्यांनी दिला… ते काम झाले. लोकसभेत भाजपचे युपी मधून अर्धे खासदार कमी होतील. टीव्ही गोदी, चाटू मीडिया, २०२४ चा भाजपचा मार्ग मोकळा झाला असे बोंबा मारत आहेत. कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधावा तसा त्यांचा गोदी मीडिया च्या गळ्यात पट्टा बांधला आहे. गोदी मीडिया नावाची हलकट जमात लोकशाही मध्ये नव्याने जन्मला आले आहेत. यांचा ही मुकबला लोकशाही वाचवणाऱ्याना आता करावा लागेल. जसा अंध ,भंपक भक्ताचा आज आपण करतो.

राज्यात चंद्रकांत पाटील सरकार पडण्याचा तारखा देतोय… गेल्या अडीच वर्ष तारखा देतोय, मुंबईत वाकडं ढुंगण करून तारखा काढतोय पण त्यांना यश काही अजून मिळत नाही. या तून काय साधतो हे त्याचे त्याला माहीत. मुंबईत मराठी माणसाची टिंगल केली. तमाम मराठी माणूस भाजप विरोधात उभा राहील. उभा राहिला ही पाहिजे . गोव्यात काँग्रेस ने मोठी चूक केली, त्यांनी वेगळा निर्णय घेतला नसता तर नक्कीच त्यांना यश आले असते. ख्रिचन समाज भाजपच्या मागे जातो. हे काँग्रेस चे अपयश आहे.

महाराष्ट्रात ही बाब ते करत आहे. काँग्रेस भाजप नेते या वर वेगळे लिहिले पाहिजे. उदाहरण म्हणून अकोल्यात नगर जिल्ह्यात राज्याचे आघाडी प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यातील नगरपरिषद भाजप च्या ताब्यात सहज दिली. काँग्रेस पक्ष असच वागत राहिला तर नक्कीच तो मुळापासून उपडुन जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब यांचे बळ म्हणून जिवंत आहे. मात्र एक खंत आहे पदाधिकारी अजिबात तळागळात जात नाहीत. जनते मध्ये वावर त्यांचा शून्य आहे.

उलट भाजप पदाधिकारी जनतेत जातात सरकारी योजना लोकांना समजून सांगतात, उलट राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्ते सरकारी योजनांचा लाभ सर्व सामान्य माणसाला मिळावा म्हणून प्रयत्न करताना कुठच दिसत नाहीत. युवक, विद्यार्थी, महिला यांचे संघटन फक्त व फक्त त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी आहे. नगर जिल्ह्यात कधी या पक्षाने विचार मंथन केले आहे, असे आज तरी दिसत नाही. हीच बाब शिवसेना यांची मुंबई वगळता आहे. भाजप मात्र सक्षम होत चालला आहे.

मात्र उद्या राज्यात निवडणुका झाल्या तर नक्कीच भाजपचा रथ राज्यात रोकला जाईल, पण म. विकास आघाडीला ही भाजप सहज यश मिळवून देणार नाही. पंजाब राज्यात केजरीवाल बिन बोभाट आले. येणार ही होते, काँग्रेस ने ठोको टाळी वाजत गाजत आणली. ते मोठे काँग्रेस पक्षाचे अपयश आहे. काँग्रेस ला मतदारांनी आप पर्याय निवडला, पण भाजपचा निवडला नाही हा मुद्दा ही महत्त्व पूर्ण आहे.

भारत देशात मोदी विरोधात सक्षम पर्याय लोक पाहत आहे. तो आगामी लोक सभेत दिसेल, अन् दिसला ही पाहिजे. निवडणूक राशन मुद्यावर न होता बेरोजगारी, महागाई या मुद्यावर झाली पाहिजे. ती होईल अशी अपेक्षा आहे, कारण भारतीय मतदार सक्षम आहे…
ज्ञानेश्वर गायकर पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here