युवा संकल्प संस्था,भेंडाळा मृतक कुटुंबियांचे केले सांत्वन

0
423

युवा संकल्प संस्था,भेंडाळा मृतक कुटुंबियांचे केले सांत्वन

सुखसागर झाडे

गडचिरोली / चामोर्शी : तालुक्यातील वेलतुर रिठ येथिल शेतकरी निलकंठजी सुरकर (वय४५ वर्ष) हे दि ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी आपल्या शेतात जावुन धान पिकाला पाणी देण्यासाठी दुपारी २ वाजता गेले असता त्यांना विद्युत मोटार पंपाचा शाँक लागुन जागीच मुत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच युवा संकल्प बहूउद्देशीय संस्था भेंडाळाचे पदाधिकारी मृतकांच्या कुंटुबियांचे सात्वंन केले आणि घटनेची माहिती घेतली ही परिस्थिती बघता मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी ही युवा संकल्प संस्थेची शासनास विनंती आहे. त्यावेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.राहुलजी वैरागडे, उपाध्यक्ष मा.चेतन कोकावार, विभाग उपप्रमुख मा. देवा तुंबडे, चामोशी ग्रुप प्रमुख मा.सुरज नैताम, उपप्रमुख मा.प्रशांत चुधरी, सदस्य विजय संदोकार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here