….. विश्वासास पात्र राहून काम करावे :ना. बाळासाहेब पाटील

0
580

….. विश्वासास पात्र राहून काम करावे :ना. बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार :आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम

कराड:- लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी अतिशय महत्वाचे असून,मतदार विकासकामांची अपेक्षा ठेवूनच मतदान करतात म्हणूनच नवनिर्वाचित सदस्यांनी जेष्ठ मंडळींना सोबत घेऊन मतदारांच्या विश्वासास पात्र राहून काम करावे असे आवाहन राज्याचे सहकार-पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.

पाडळी (केसे) येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी आनंदा कदम,आनंदा बडेकर,हाशम मुजावर, सलीम मुजावर, सौ. आशामा मुजावर,
सौ. रेश्मा पटेल, सौ. रईसा पटेल, सौ. शैला शिल्पी,सौ. प्रज्ञा काळे, सौ. जाधव या पाडळी (केसे ) येथील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी ना. पाटील म्हणाले,गावाच्या विकासकामाबद्दल नागरिकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असतात. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्याचा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा म्हणजे विकासकामे होण्यास दिरंगाई होत नाही.
संस्थेचे अध्यक्ष विश्वास मोहिते, जेष्ठ नेते बादशाहभाई मुजावर,फारुख पटेल,शौकत पटेल,बाबासाहेब कळके,शपिक मुजावर, साजिद पटेल, लतीफ पटेल,तिमान्ना कुराडे,भीमराव शिंदे,इराप्पा शिंदे, लक्ष्मण कुराडे, परशुराम शिंदे, फिरोज कागदी,अक्षय जाधव, किशोर काळे, मोसीम मुजावर,रामभाऊ पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here