भिक नको, हक्काचा अतिवृष्टी निधी हवा

0
481

भिक नको, हक्काचा अतिवृष्टी निधी हवा

उपोषण कर्ता शेतकरी बांधवाची संतप्त मागणी

 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पोंभूर्णा तालुक्यात वेळवा माल, वेळवा चक, सेल्लूर नागरेड्डी, सेल्लूर चक, येथील शेतकरी यांच्या शेतपिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. मात्र पोंभूर्णा तहसीलदार यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतपिक नुकसानीची कोणतीही चौकशी न करता बोगस पंचनामे करुन हेतुपुरस्सर शासनाच्या मिळणाऱ्या निधी पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. याचा आक्रोश येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन केला होता. परंतु मुजोर तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांच्या हलगर्जी पणा मुळे आज शेतकरी न्याय मिळावा म्हणून गेल्या चार दिवसापासून तहसील कचेरी समोर आमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणातून उपोषण कर्त्यांनी आम्हाला भिक नको हक्काचा अतिवृष्टी निधी हवा अशी संतप्त मागणी करीत असून शासन-प्रशासनाचा धिक्कार करीत आहेत.

 

जनतेचे पालक की, हुकुमशाहीचे चालक ?
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यात शेतकऱ्यावर अशी उपासमारीची पाळी येऊन आपल्या न्याय मागण्या करीता उपोषण करावे लागते. ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे पालकमंत्री हे जनतेचे पालक की, हुकुमशाहीचे चालक आहेत असा सवाल उपोषण कर्त्यांनी उपस्थित केला आहे.

 

उपोषण कर्त्याची प्रकृती ढासळली, एक चिंताजनक
गेल्या चार दिवसापासून आपल्या हक्काच्या मागण्या घेवून आमरण उपोषण करीत आहेत. सतत चार पाच दिवसापासून पोटात अन्नाचा घास घेतला नसल्याने उपोषण कर्त्याची प्रकृती ढासळली असून एक जन नामदेव आत्राम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

उपोषण कर्ते व उपोषणाच्या मागण्या
दौलत फकीरा देवगडे, नामदेव तुकाराम आत्राम, वासुदेव किचय्या कावटवार, शामराव मारोती आत्राम, रामचंद्र मारोती कुंभरे, सुरेश हनुमान लोणारे, मधुकर रामा मेश्राम, सखाराम केशव कन्नाके अशी आठ शेतकरी बांधव उपोषण करीत अतिवृष्टी नुकसान निधी सरसकट हेक्टरी १३६००/- मिळाला पाहिजे, माहे जुलै-आगष्ठ-सप्टेम्बर चे सर्वे आता गृहीत धरु नये, ज्या शेतकऱ्यांचे चुकीचे सर्वे करुन कमी नुकसान देण्यात आली त्यांना सुद्धा सरसकट शासन निर्णय प्रमाने नुकसान भरपाई देण्यात यावी, चुकीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या तहसील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांचे तात्काळ निलंबन करुन बडतर्फ करावे अशा प्रमुख मागण्या घेवून उपोषण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here